Home महाराष्ट्र शहीद भगतसिंग न.प.शाळेत विद्यार्थिनींना सायकल वाटप

शहीद भगतसिंग न.प.शाळेत विद्यार्थिनींना सायकल वाटप

237

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.26नोव्हेंबर):-रोजी शहिद भगतसिंग न. प. व प्राथ व माध्य शाळा क्र 2 येथे मानव विकास मिशन योजने अंतर्गत शाळेतील 35 विद्यार्थिनींना सायकलचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार तथा नगराध्यक्ष उमरखेड मा श्री नामदेवरावजी ससाणे साहेब, प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष मा. श्री नितिनजी भुतडा साहेब यांची उपस्थिती लाभली.

तर विशेष उपस्थितीमध्ये श्री प्रकाशजी दुधेवार सर शिक्षण सभापती न.प उमरखेड, श्री राजू भैय्या जयस्वाल न.प. सदस्य, श्री संदीपजी ठाकरे न.प. सदस्य तथा जि.नि.स. सदस्थ, सौ. कवितालाई खंदारे मॅडम नगरसेविका, श्री खंदारे साहेब ग.शि.अ. उमरखेड, श्री राहत अन्सारी सर केंद्रप्रमुख न.प. यांची उपस्थिती लाभली. मान्यवरांनी विद्यार्थीनीशी संवाद सवांद साधला व त्यांना सायकलचे वितरण केले.

या यशस्वी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रभारी मुख्याध्यापक श्री आशिष राठोड सर, श्री सुर्यवंशी सर, श्री कोरडे सर, श्री बुरफुले सर, श्री चौधरी सर, श्री कवडे सर, श्री एस. के. काळे सर, श्री एस. एस. काळे सर, कु. हिंगोले मॅडम, कु. म्हैसकर मॅडम, कु. कदम मॅडम, नंदनवार मॅडम, पिठ्ठलवाड मॅडम सौ. वाढवे ताई श्री साबळे भाऊ या सर्वांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here