Home महाराष्ट्र कायदा व सुव्यवस्था दरम्यान बुलडाणा जिल्हा पोलीसांनी सामाजिक उत्तरदायित्वाची भावना जोपासत दिला...

कायदा व सुव्यवस्था दरम्यान बुलडाणा जिल्हा पोलीसांनी सामाजिक उत्तरदायित्वाची भावना जोपासत दिला मानवतेचा संदेश

286

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

बुलढाणा(दि.24नोव्हेंबर):- अमरावती शहरातील घडलेल्या दंगली दरम्यान अमरावती येथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माणा झाल्याने बुलडाणा जिल्हयातुन अतिरिक्त बंदोबस्त अमरावती येथे पाठविण्यात आला होता . बुलडाणा जिल्हयातुन गेलेल्या पोलीस जवानांची राहण्याची व्यवस्था राष्ट्रसंत गाडगे महाराज वृध्दाश्रम वलगांव येथे होती . यादरम्यान वृध्दाश्रमातील संचालक , वृध्द व बुलडाणा पोलीस अंमलदार यांच्यात कौटुंबीक जिव्हाळयाचे वातावरण तयार झाले त्यातुनच उत्तरदायित्वाची भावना म्हणुन एएसआय शेख असलम , पोना नागेश अंभोरे , पोकॉ . वायाळ , पोकॉ . गणेश जाधव यांचे संकलपनेतुन सह अंमलदार यांनी वृध्दांना परतीच्यावेळी रुमाल , टोपी , साडी , पातळ देवुन निरोप घेतला . भावनिक बंध व सामाजिक कर्तव्य यांचा संगम यावेळी सर्वांनी अनुभवला .

पोलीस ही केवळ वेगळी संकल्पना नसुन समाजाचे रक्षण व सामाजिक सलोख्याचा एक आदर्शवत आधारस्तंभ आहे हा विश्वास सामाजमनात पोचविण्याचे मोलाचे कार्य या पोलीस अंमलदारानी पार पाडले . निरोप घेतांना वृध्दाश्रमाचे संचालक , वृध्द , व पोलीस अंमलदार यांना भावना अनावर झाल्या होत्या . बुलडाणा जिल्हा पोलीस दलातील अंमलदारांच्या या सत्कार्याबद्दल मा . श्री . अरविंद चावरिया , पोलीस अधीक्षक बुलडाणा , मा . श्री . बजरंग बनसोडे अपर पोलीस अधीक्षक बुलडाणा , श्री . बळीराम गीते , पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बुलडाणा , यांनी आनंद व्यक्त करुन त्यांना शुभेच्छा दिल्या .

Previous articleजिवती येथे गोंडवाना गणतंत्र पार्टी आणि भाजपला खिंडार
Next articleकाँग्रेसचे जनजागरन अभियान केंद्राच्या महागाई विरोधातील लोकचळवळ यशस्वी करण्याची गरज – काँग्रेस जिल्हा अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांचे प्रतिपादन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here