Home महाराष्ट्र सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी मला विधान परिषदेवर आमदारकी द्या

सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी मला विधान परिषदेवर आमदारकी द्या

412

🔸किसान पुत्र श्रीकांत गदळे यांची राज्यपाल महोदयांकडे मागणी

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

केज(दि.24नोव्हेंबर):-तालुक्यातील दहिफळ येथील रहिवासी किसान पुत्र श्रीकांत विष्णु गदळे यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्यपाल महोदयांना लेखी निवेदनाद्वारे मला विधान परिषद आमदार की द्या अशा मागणीचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राज्यपाल महोदय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे मागणी केली आहे.

या विषयी सविस्तर माहिती अशी की केज तालुक्यातील किसान पुत्र श्रीकांत विष्णू गदळे ता. केज जि. बीड येथील रहिवासी असून त्यांनी मा. राज्य पाल महोदयांना पत्रात असे म्हटले आहे की मी गेल्या दहा ते बारा वर्षापासून समाज कारणांमध्ये अग्रेसर आहे गेल्या दहा ते बारा वर्षापासून राज्यामध्ये शेतकरी शेतमजूर व कष्टकरी जनता तसेच सर्वसामान्य जनता यांच्या प्रश्नावर सातत्याने काम करत आहे.

परंतु सध्या काम करत असताना माझ्याकडे सध्या कसल्याही प्रकारचे पद नसल्यामुळे मला सर्वसामान्य जनतेचे व शेतकरी शेतमजूर तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मला खूप अडचणींना तोंड द्यावे लागत आहे त्यामुळे माननीय राज्यपाल महोदयांनी मला माझ्या कामाचा अनुभव लक्षात घेऊन मला शासकीय कोट्यातून शेतकरी वर्ग सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी विधानपरिषदेवर आमदार की द्यावी अशी मागणी राज्यपाल महोदयांना केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here