Home महाराष्ट्र सातारा जिल्हा बँकेवर राष्ट्रवादी प्रणित सहकार पँनेलचे वर्चस्व; गृहराज्यमंत्र्याना पराभवाचा धक्का तर...

सातारा जिल्हा बँकेवर राष्ट्रवादी प्रणित सहकार पँनेलचे वर्चस्व; गृहराज्यमंत्र्याना पराभवाचा धक्का तर सहकारमंत्री यांचा काँग्रेसच्या वर्चस्वाला धक्का

280

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

सातारा(दि.23नोव्हेंबर):-जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निवडणूक निकाल आज जाहीर झाला अंत्यत चुरशीच्या झालेल्या लढतीत दिग्गजाना पराभवाचा सामना करावा लागला.
राष्ट्रवादीने निवडणूक प्रतिष्ट्येची करून यापूर्वीच 21 पैकी 11 उमेदवार बिनविरोध करून बैंकेवर आपले वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले.दहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शरद पवार यांचे अत्यन्त विश्वासू समजले जाणारे आमदार शशिकांत शिंदे यांना जावळी सोसायटी गटातून पराभवाला सामोरे जावे लागले त्याचा केवळ एका मताने पराभव झाला तर गृहराज्यमंत्र्याना पाटण सोसायटी गटा मधून राष्ट्रवादीचे उमेदवार सत्यजित पाटणकर यांच्याकडून धोबीपछाड मिळाला.

खटाव सोसायटी गटातून राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना डावलून अजित पवार यांनी त्यांचे जवळचे नंदकुमार मोरे यांना उमेदवारी देऊन रिंगणात उतरविले पण त्यांचा पण पराभव प्रभाकर घार्गे यांनी करून अजित पवारांना एकप्रकारे मोठा धक्काच दिला.माण सोसायटी गटातमध्ये सामना टाय झाला दोन्ही उमेदवाराला समान मते मिळाल्यामुळे ईश्वरी चिठ्ठीने शेखर गोरे यांना कौल दिला त्यामुळे राष्ट्रवादीचे मनोज पोळ यांना पराभवाचे तोंड पहावे लागले असाच प्रकार कोरेगावमध्ये सोसायटी गटात झाला त्यामध्ये बाजी शिवसेना उमेदवार सुनील खात्री यांनी महाडिक यांचा पराभव केला.सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी अत्यांत प्रतिस्थेच्या लढाईत कराड सोसायटी गटात भाजपची मदत घेत काँग्रेसचे उमेदवार उदयसिह उंडाळकर याचा पराभव करून त्याच्या वडिलांचा पारंपारिक मतदार संघावर आपला कबजा केला.

*जावळी सोसायटी गटात ज्ञानदेव रांजणे विजयी*
*पाटण सोसायटी गटात सत्यजित पाटणकर विजयी*
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा केला पराभव
पाटणकर यांना ५८ मते तर देसाईंना ४४ मते
*खटाव सोसायटी गटात प्रभाकर घार्गे विजयी*
नंदकुमार मोरेंना ४६ मते तर प्रभाकर घार्गे ५६ मते
*कराड सोसायटी गटात सहकारमंत्री बाळासाहेब पाटील विजयी*
सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना ७४ तर उदयसिंह पाटील यांना ६६ मते
*बँक व पतसंस्था गटात रामराव लेंभे विजयी*
रामराव लेंभे  ३०७  तर सुनील जाधव यांना ४७ मते
*ओबीसी प्रवर्ग गटात प्रदीप विधाते विजयी*
विधाते यांना १४५९ तर शेखर गोरे यांना  ३७९  मते
*महिला प्रवर्ग गटात राष्ट्रवादीच्या ऋतुजा पाटील व कांचन साळुंखे विजयी*
ऋतुजा पाटील १४४५
कांचन साळुंखे १२९२
शारदादेवी कदम ६१८
चंद्रभागा काटकर १४१ मते
*माण / कोरेगाव सोसायटी गटात उमेदवारांना समान मते*
*माण व कोरेगावमध्ये टाय*
माण- 36-36
कोरेगाव – 45-45
कोरेगाव सोसायटी गटात सुनील खत्री विजयी
ओबीसी प्रवर्गात राष्ट्रवादीचे प्रदीप विधाते यांनी शेखर गोरे याचा मोठ्या फरकाने पराभव केला पण माँ सोसायटी गटात *शेखर गोरे ठरले *लकी मॅन*
*सातारा जिल्हा मध्यवर्ती* *सहकारी बँकेच्या पंचवार्षिक* *निवडणुकीत माण प्राथमिक कृषी* *पतपुरवठा गटातील उमेदवारांना सम-समान मते मिळाली होती. दोघांना प्रत्येकी 36 मते मिळाली होती.*
*- त्यामुळे येथील विजयी उमेदवार चिठ्ठीद्वारे ठरवण्यात आला. येथून शेखर गोरे विजयी झाले आहेत.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here