



🔸 7 महिलांनी बांधले शिवबंधन
✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमूर(दि.23नोव्हेंबर):-चिमूर तालुक्यात्यातील शिवसेना पक्षाला सुगिचे दिवस आले असून शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते व महिला आघाडी तालुका प्रमुख सौ, माधुरी केमये यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवत आज दिनांक 23 नोव्हैम्बर रोजी विविध पक्षातील 6 महिला पदाधिकारियांनी शिवसेना पक्षात प्रवेश घेतला.
शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वादाने, शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख तथा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे कार्यावर प्रभावित होऊन शिवसेना जिल्ह्या प्रमुख नितीन मत्ते, उपजिलाप्रमुख अमृत नखाते, विधानसभा समन्वयक भाऊराव ठोम्बरे यांचे मार्गदर्शनात, चिमूर शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते, यांचे प्रमुख उपस्थित बोडधा येथील सौ लता रामु गेडाम, स्वेता सखाराम बोरकर, लक्ष्मी सुधाकर उइके, उज्ज्वला सिद्धार्थ मेश्राम, वनिता वीजय मेश्राम, मंगला मधुकर बोरकर, गीता दिनकर उइके या विविध पक्षातिल महिलांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.
यावेळी डोमा पंचायत समिति विभाग प्रमुख कवडू खेड़कर, जामभुलघाट शाखा प्रमुख विनोद भूयारकर, तालुका संगठक रोशन जुमड़े, युवासेना तालुका प्रमुख शार्दूल पचारे, चिमूर शहर प्रमुख अनंता गिरी, प्रसिद्धि प्रमुख सुनील हिंगणकर उपस्थित होते


