Home महाराष्ट्र गेवराई तालुका प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी चंद्रकांत नवपुते तर विभागीय अध्यक्षपदी चंद्रकांत हक्कदार...

गेवराई तालुका प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी चंद्रकांत नवपुते तर विभागीय अध्यक्षपदी चंद्रकांत हक्कदार यांची निवड -पारदर्शक कारभार करण्याचा नवीन कार्यकारिणीचा निर्णय

322

✒️प्रतिनिधी प्रतिनिधी(समाधान गायकवाड)

गेवराई(दि.23नोव्हेंबर):- नोव्हेंबर रोजी गेवराई प्रेस क्लबची महत्वपुर्ण बैठक घेण्यात येऊन विविध पदाधीकार्ऱ्यांच्या निवडी घोषित करण्यात आल्या .विविध दैनिक व इलेक्ट्रॉनिक मिडियाचा समुह ( प्रेस क्लब) गेल्या वर्षभरापासून कार्यरत आहे. रविवारी दुपारी २: ००वाजता बापुसाहेब हुंबरे यांच्या अध्यक्षेतेखाली विविध पत्रकारांच्या उपस्थितीत गेवराई प्रेस क्लबची २०२१ – २०२२या वर्षीची कार्यकारिणी घोषित करण्यात आली. जुनी कार्यकारिणी बरखास्त करून नविन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या .गेवराई प्रेस क्लबच्या शहर अध्यक्षपदी दैनिक तरुण भारतचे तालुका प्रतिनिधी प्रा. चंद्रकांत नवपुते यांची तर विभागीय अध्यक्षपदी् चंद्रकांत हक्कदार ( संपादक बीड हॅलो रिर्पाटर ) यांची निवड करण्यात आली .उपाध्यक्षपदी दैनिक झुंजार नेताचे सुभाष शिंदे यांना निवडण्यात आले.

प्रेस क्लबच्या सचिव पदी सखाराम पोहिकर व संघटक पदी बापुसाहेब हुंबरे यांची निवड करण्यात आली . सह संघटक शेख यासीनभाई सहसचिव घोडके चक्रधर , कायदेशीर सल्लागार अॅड कारके सोमेश्वर यांची तर प्रसिद्धी प्रमुख म्हणुन जे. डी. शहा , कोहळे देवराव व कोषाध्यक्ष म्हणून पत्रकार चव्हाण गोपाल सह कोषाध्यक्ष सौदागर इम्रान मार्गदर्शक म्हणून जेष्ठ पत्रकार तथा संपादक रामजी रूकर व पाचपुते अंकुश ( दादा ) , कार्याध्यक्ष हाकाळेे राहुल आादींची सर्वानुमते निवड करण्यात आली .सदरील महत्वपुर्ण बैठकीत प्रेस क्लबच्या नियम वअटींचे पालन करून कार्य करण्यासाठी सर्वोना सुचना जारी करण्यात आल्या.येत्या वर्षाभरात गेवराई प्रेस क्लबच्या वतीने समाजहिताचे उपक्रम राबवुन पत्रकारांच्या विविध समस्या सोडविण्याचा तसेच या पुढे सर्वांना विश्वासात घेऊन प्रेस क्लब चा कारभार पारदर्शक करण्याचा महत्वपूर्ण निर्णय या वेळी घेण्यात आला .

Previous articleडॉ. प्रवीण घोडेस्वार यांना ‘फिरत्या चाकावरती’ या सदरासाठी लाडली मिडिया पुरस्कार प्रदान
Next articleचिमूर तालुका शिवसेना पक्षात अनेक महिलांचा प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here