




✒️नासिक,जिल्हा प्रतिनिधी(विजय केदारे)
नाशिक(दि.23नोव्हेंबर):– सासरच्या शारीरिक व मानसिक त्रासास कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे याप्रकरणी नासिक रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे त्यानुसार पोलिसांनी पवारवाडी जेलरोड येथील संशयित पती नितीन धनराज ठाकरे सासरे धनराज राजाराम ठाकरे सासु जनाबाई ठाकरे दीर सुरज ठाकरे ननंद ताई ठाकरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे अशा उर्फ दिव्या नितीन ठाकरे वय 19 असे मृत्यू झालेल्या विवाहित मुलीचे चे नाव आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार आशा ठाकरे या सासरी नांदत असताना सासरच्या मंडळींनी त्यांचा मानसिक व शारीरिक छळ केला नोकरी लावण्यासाठी माहेरुन तीन लाख रुपये आणावेत अशी पती नितीन ठाकरे याने पत्नी आशा ठाकरे यांच्याकडे वारंवार मागणी केली माहेरून पैसे आणले नाहीस आणले नाहीस तर तुला मारून टाकू अशी धमकी त्याने पत्नीस दिली होती त्यामुळे ती मानसिक तणावाखाली होती तिने छळास कंटाळून आत्महत्या केली पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक हंडोरे करत आहेत




