Home चंद्रपूर स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ङिजिटल मीडिया पत्रकारांची कार्यशाळा

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ङिजिटल मीडिया पत्रकारांची कार्यशाळा

76

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.23नोव्हेंबर):-पत्रकारिता हे लोकशिक्षण व समाजशिक्षणाचे एक माध्यम आहे. पूर्वीही ते होते. मात्र, स्वातंत्रानंतर त्यांचे स्वरूप बदलले आणि मागील ५ वर्षांपासून त्यात डिजिटल पत्रकारितेने प्रवेश केला आहे. भारतीय व जगभरातील पत्रकारितेचे बदलते स्वरुप यावर पर्यावरण अभ्यासक ङाॅ. संगीता तोडमल यांनी अमेरिकेतून संवाद साधला. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त काव्यशिल्प डिजिटल मीडियाच्या वतीने महाराष्ट्रातील ङिजिटल मीडिया पत्रकारांची कार्यशाळा रविवारी घेण्यात आली.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देशभरात विविध उपक्रम सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून ही ऑनलाईन कार्यशाळा घेण्यात आली. यात अमेरिकेतस्थित पर्यावरण अभ्यासक ङाॅ. संगीता तोडमल यांनी संवाद साधला.

आज भारतच नव्हे तर संपूर्ण जगात प्लास्टिक चर्चेचा विषय बनला आहे. वाढत्या प्रदूषणात प्लास्टिकचे मोठे योगदान आहे. म्हणून जर आजच प्लास्टिक च्या उपयोगाला आळा घातला गेला नाही तर भविष्यात मानवी जीवन मोठ्या संकटात येईल.

प्लास्टिकचा उपयोग आज प्रत्येक ठिकाणी केला जात आहे, भाजीपाला किंवा घराची कोणतीही किराणा वस्तू घ्यायला बाजारात गेल्यावर प्लास्टिक ची पिशवी दिली जाते. प्लास्टिकच्या अतिवापराने निसर्गाला नुकसान सहन करावे लागत आहे. मनुष्याने प्लास्टिकचा शोध लावला आहे, परंतु हा शोध मनुष्यासाठीच हानिकारक सिद्ध होत आहे. प्लास्टिक कधीही सडत नाही. प्लास्टिकला जमिनीमध्ये टाकल्याने झाडांच्या मुळांना ते नुकसान पोहोचवते त्यामुळे प्लास्टिक आपण टाळले पाहिजे तसेच आधुनिक युगात पत्रकारिता क्षेत्रातही बदल झाले आहेत. सध्या वेब पत्रकारितेचे युग आहे. त्यामुळे डिजिटल पत्रकारांनी जबाबदारीने पत्रकारितेचे आवाहन करण्यात आले.

Previous articleअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रशांत भंडारे यांच्या कवितेची निवड
Next articleदोन दुचाकींची समोरासमोर धडक,दोन जण ठार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here