




✒️रोशन मदनकर(उप संपादक)
चंद्रपूर(दि.23नोव्हेंबर):-दिनांक ३,४ व ५ तारखेला नाशिक येथे संपन्न होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात श्री प्रशांत भंडारे यांच्या ‘दिशाहीन पाखरे’ या कवितेची निवड कविकट्ट्यासाठी करण्यात आली आहे. सदर कवितेचे सादरीकरण दिनांक ५डिसें.२०२१ला ११:३० ते १२वाजताच्या सत्रात करण्यात येईल.बल्लारपूर तालुक्यातील आमडी या लहानशा गावातील रहवासी प्रशांत मंगरू भंडारे हे शिक्षण क्षेत्रात शिक्षक म्हणून सेवेत आहेत. शैक्षणिक कार्य उत्तमरीतीने सांभाळत त्यांनी काव्यलेखनाचा छंद जोपासला आहे.
गझल,वृत्तबद्ध कविता आणि इतर छंदोरचना यांच्यावर उत्तम प्रभुत्व असणारे प्रशांत भंडारे नवोदित कवी मंडळींसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत. त्यांचा ‘कवडसा’ नावाचा काव्यसंग्रह लवकरच प्रकाशित होत आहे. झाडीबोली साहित्य मंडळ, बल्लारपूरच्या तालुका प्रमुख पदी त्यांची निवड करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील कवीच्या कवितेची निवड अ.भा.म.सा. संमेलनात झाली ही बाब अत्यंत अभिमानास्पद आहे.अनेक काव्य स्पर्धा, गझल मुशायरे आणि काव्य संमेलनात आपल्या काव्य शैलीचा ठसा उमटवणारे श्री प्रशांत भंडारे यांच्या ‘दिशाहीन पाखरे’ या कवितेची निवड कविकट्ट्याकरीता झाल्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.




