




✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)
पुसद(दि.23नोव्हेंबर):-मुस्लिम समाजच्या न्याय हक्कासाठी वंचित बहुजन आघाडी सातत्याने आवाज उठवीत आहे.दि.05 जुलै 2021 रोजी विधानभवनावर मोर्चा काढून न्यायालयाने मान्यता दिलेल्या 5% मुस्लिम शैक्षणिक आरक्षणाची तातडीने अमलबजावणी करावी आणि वंचित बहुजन आघाडीने दिलेले पेंगबर मोहम्मद बिल पास करावे व इतर मागण्यांचे निवेदन मा. उद्धवजी ठाकरे साहेब महाराष्ट्र पर्येंत पोहचण्याचा आलेले होते.त्याचाच पुढचा टप्पा म्हणून श्रद्धेय मा.बाळासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांच्या आदेशानुसार तसेच मा.धनंजय गायकवाड जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यवतमाळ जिल्हा यांच्या नेतृत्वाखाली मा.तहसीलदार साहेब पुसद यांना निवेदन देण्यात आले.निवेदना मध्ये खालील मागण्याचे निवेदन देण्यात आले आहे.
१)न्यायालयाने मान्यता दिलेले 5% मुस्लिम शैक्षणिक आरक्षण तात्काळ लागू करण्यात यावे.
२)धार्मिक भावना भडकावून समाजात तेढ निर्माण करणार्यांना कठोर शिक्षा देणारे पैगंबर मोहम्मद बिल अधिवेशनात मंजूर करून तात्काळ तो कायदा लागू करावा.
३)महाराष्ट्र वफ्फ बोर्डाच्या मिळकतीमध्ये वाद करून ईमाम व नियज्जीम सुदाम हजरात यांना मासिक वेतन सुरू करण्यात यावे.
४)संत विचाराचा प्रसार प्रचार करणार्यांना ह.भ.प.कीर्तनकार यांना शासनाकडून मासिक वेतन सुरू करण्यात यावे.
५)वफ्फ बोर्डाच्या जमिनीवर झालेले अवैध कब्जे हटऊन त्या जागेच्या अल्पसंख्याक समाजाच्या उन्नतीसाठी उपयोग करावा.
६)सारथी,बार्टी,महाज्योती प्रमाणे मुस्लिम अल्पसंख्याक समाजातील विध्यार्थ्यासाठी स्वतंत्र प्रशिक्षण संस्थेची स्थापना करण्यात यावी.! इत्यादी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
निवेदन देतेवेळेस वंचित बहुजन आघाडी चे तालुका अध्यक्ष मा.बुद्धरत्न भालेराव,प्रकाश खिलारे,पद्मा दिवेकर मॅडम,प्रसाद खंदारे,विशाल डाके इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.




