




✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114
गेवराई(दि.23नोव्हेंबर):-ऊसतोडणीसाठी आलेल्या मंजूराची मोटरसायकल गेवराई तालुक्यातील तळणेवाडी येथून चोरी गेली आहे, पोटाची खळणी भरण्यासाठी बाबासाहेब दत्तू राठोड (रा,कुभेजळगाव,ता,गेवराई,जि,बीड) हा ऊसतोड मंजूर गेवराई तालुक्यातील तळणेवाडी येथे ऊसतोडणी करत आहे, दिवस भर ऊसतोडणीसाठी गेल्यावर रोजी प्रमाणे मोटरसायकल स्वतः च्या राहण्याची अड्ड्यावर लावलेली असते, तिथून मोटरसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २० नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ४ च्या सुमारास घडली.
या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,बाबासाहेब राठोड यांनी आपली काळ्या रंगाची एच. अफ डिल्याक्स कंपनीची मोटरसायकल ( MH. २३ AQ. 6184 ) राहण्याच्या जागेवर रोजी प्रमाणे उभी केल्याली होती, यावेळी अज्ञात चोरट्यांनी ही मोटरसायकल पळून नेली, याप्रकरणी बाबासाहेब राठोड यांच्या फिर्यादीवरून गेवराई पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास पोलीस करत आहेत




