Home महाराष्ट्र चिमुर येथील शेतकऱ्याची आत्महत्या

चिमुर येथील शेतकऱ्याची आत्महत्या

59

✒️नेरी प्रतिनिधी(नितीन पाटील)

चिमुर(दि.23नोव्हेंबर):- येथील रहिवासी भगवान श्रीराम हजारे वय ६० वर्ष या शेतकऱ्याने आज दि.२२-११-२१ ला स्वतः चे शेतातील झोपडीत गडफास लावुन आत्महत्या केली.वडाळा हल्क्यातील सेंट क्लँरेटच्या मागील बाजूस राऊत देव टेकडी रस्त्याच्या कडेला सदरील शैतकऱ्याची शेती असुन शेतामध्ये झोपडी आहे.

भगवान हे आज सकाळी दुध वाटप करण्यासाठी घरुन निघाले व घरी परत आलेच नाही म्हणून त्यांच्या मुलाने सा.४ वाजताचे सुमारास शेताकडे जावून बघीतले असता गायी वगैरे जनावरे झोपडी लगत बांधून दिसले त्यामुळे संशय आला आणी मुलाने झोपडीत जावून बघीतल्यानंतर वडिलांने गडफास लावून झोपडीत आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.

सदरील घटनेची माहिती चिमुर पोलीस स्टेशनला दिल्यानंतर ठाणेदार मनोज गभने यांनी आपल्या सहकार्यासह घटनास्थळी जावुन गडफास लावलेल्या स्थितीतील शव उतरवून पंचनामा करुन प्रेत उत्तरीय तपासणी स चिमुर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.आत्महत्येच नेमके कारण हे मात्र समजु शकले नाही सदरील घटनेचा पुढील तपास ठाणेदार मनोज गभने यांचे मार्गदर्शनाखाली मेजर घनशाम मेहरकुरे, रोशन तामशेट्टीवार, सुखराज जाधव,दिलीप वाळवे ,नितेश गुडधे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here