



✒️अतुल बडे(परळी वैजनाथ,प्रतिनिधी)
परळी(दि.8ऑक्टोबर):-नवरात्रोत्सवात प्रभु वैद्यनाथ- डोंगरतुकाई-काळरात्री देवी दर्शनाला जाणार्या परळीतील भाविकांसाठी माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी मोफत वाहन व्यवस्था केली असुन या सुविधेचा आज (दि.७) राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आला.नवरात्रोत्सवात प्रभु वैद्यनाथ,आरोग्यभवानी डोंगरतुकाई देवी, काळरात्री देवी दर्शनासाठी दररोज हजारोंच्या संख्येने भाविकांची मांदियाळी असते भाविकांना दर्शनासाठी जाण्या-येण्याची सुलभ व्यवस्था व्हावी यासाठी माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी मोफत वाहन व्यवस्था केली आहे.
नवरात्रोत्सवात सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मोफत वाहन व्यवस्था उपलब्ध असणार आहे.या सुविधेचा अधिकाधिक भाविकभक्तांना. लाभ होणार आहे. वैद्यनाथ मंदिर-काळरात्री मंदिर ते अंबाआरोग्य भवानी डोंगरतुकाई मंदिर या मार्गावर भाविकांना मोफत वाहन सेवा देण्यासाठी 2 बसेस सुरु करण्यात आल्या आहेत.
या सुविधेचा आज (दि.७) राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आला.यावेळी पं.स. सभापती बालाजी मुंडे, माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, नगरसेवक चंदुलाल बियाणी, दिपक देशमुख, वैजनाथ सोळके,राजाभाऊ पौळ, सुरेश टाक,रविंद्र परदेशी,राजेंद्र सोनी,अनिल अष्टेकर,संजय फड,जयप्रकाश लड्डा,रमेश भोयटे,शंकर कापसे, के.डी. उपाडे,ज्ञकुमार व्यवहारे,शाम आघाव सर,प्रा.अशोक चव्हाण,गिरीष भोसले, गजानन हालगे,अनंत कुलकर्णी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


