Home महाराष्ट्र बँकांनी आपली सामाजिक जबाबदारी पार पाडावी- जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती

बँकांनी आपली सामाजिक जबाबदारी पार पाडावी- जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती

268

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

बुलडाणा(दि.7ऑक्टोबर):- नागरिकांच्या प्रगती सोबतच देशाची प्रगती होत असते. देशाच्या प्रगतीमध्ये बँकांचा मोठी भूमिका आहे. अशावेळी बँकांनी व्यवस्थितरित्या व जबाबदारीने आपली भूमिका पार पाडावी. व्यवसाय कर्ज, शैक्षणिक कर्ज हे विनातारण व सहाजरीत्या मंजूर करायला पाहिजे. गरजू लोकांना कर्जाच्या रूपाने मदत करुन आपली सामाजिक जबाबदारी पण पार पाड़ावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी आज केले आहे.भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या निर्देशानुसार देशात 7 ते 15 ऑक्टोंबर पर्यंत क्रेडिट आऊटरीच अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्यामध्ये आज 7 ऑक्टोंबर रोजी नगर पालिका हॉल, बुलडाणा येथे दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली व अग्रणी बैंक सेंट्रल बैंक ऑफ़ इंडियाच्या पुढाकराने कर्ज मेळावा पार पाडला. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. या मेळाव्यात बुलडाणा येथील सर्व सरकारी व खाजगी बँकाद्वारे विविध सरकारी योजनांमध्ये कर्ज वाटप केले गेले.

या कर्ज मेळाव्यामध्ये सर्व बॅकांनी मिळून 2 हजार 188 खातेदारांना 36 कोटी 77 लक्ष 57 हजार 726 रूपये एवढे कर्ज मंजूर केले आहे. यापैकी बऱ्याच खातेदारांना जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांच्याहस्ते कर्ज वाटप करण्यात आले. तर काही खातेदारांना वाहनाच्या चाव्या देण्यात आल्या. त्याचप्रमाणे प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेअंतर्गत नारायण पांडुरंग सोसे रा. मेहुणा राजा ता. दे. राजा यांना बँकक ऑफ़ इंडियाद्वारे धनादेश प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी व्यासपीठावर नगर पालिकेचे मुख्याधिकारी गणेश पांडे, सेंट्रल बँकेचे उप क्षेत्रीय प्रबंधक नयन सिन्हा, नाबार्डचे विक्रम पठारे, जिल्हा कृषि अधीक्षक नरेन्द्र नाइक, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अशोक खरात, जिल्हा उद्योग केन्द्राचे महाव्यवस्थापक सुनील पाटील उपस्थित होते.
प्रस्ताविकामध्ये सेंट्रल बैंकचे उप क्षेत्रीय प्रबंधक श्री सिन्हा म्हणाले, जिल्ह्याचा सीडी अनुपात हा 65 टक्के असून तो आपल्या विभागमध्ये सर्वाधिक आहे. पीक कर्जाचे वाटप 1000 कोटी पेक्षा जास्त झाले असून ते 80 टक्के एवढे आहे. संचालन अग्रणी बँक जिल्हा व्यवस्थापक नरेश हेड़ाऊ यांनी तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय नागरी जीवन्नोती अभियानाचे महेंद्र सौभाग्ये यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here