Home धार्मिक  विधवा भगिनींसाठी या नवरात्रात तुम्ही हे कराच please

विधवा भगिनींसाठी या नवरात्रात तुम्ही हे कराच please

298

नवरात्र हा स्त्री शक्तीचे सामर्थ्य प्रकट करणारा उत्सव आहे.हा स्त्री सामर्थ्याचा उत्सव साजरा करताना,प्रकाशाची दीपमाळ लखलखताना ज्यांची जगण्यावरची श्रद्धाच विझली आहे.अशा अंधारात जगणाऱ्या विधवा भगिनींना भेटून त्यांच्यात आत्मविश्वासाची ज्योत पुन्हा पेटवायला हवी

*आपण काय करू शकतो…?*

१) नाशिकला एका विधवा भगिनीने आत्महत्या केल्यावर यांच्या मानसिक एकटेपणाचा मुद्दा लक्षात घेऊन नवरात्रात आपल्या परिसरातील विधवा/परित्यक्ता भगिनींच्या घरी जाऊन नुसती विचारपूस केली,अडचणी समजून घेतल्या तरी त्यांना आधार वाटेल… *९ दिवसात किमान ९ कुटुंबाना भेटी देऊ या*

२) या महिलांना संजय गांधी निराधार पेन्शन योजना,त्यांच्या १८ वर्षाच्या आतील दोन मुला- मुलींना बालसंगोपन योजनेत प्रत्येकी ११०० रुपये प्रत्येक महिन्याला मिळू शकतात व दारिद्र्यरेषेखालील महिलांना तहसीलदार कार्यालयातून २०,००० अकस्मात मृत्यू विषयी कुटुंब मदत मिळू शकते. या ३ योजनांचे फॉर्म भरायला जर मदत केली तर त्या कुटुंबाला खूप मोठा आधार होईल

३) त्या महिलांचे सासरच्या संपत्तीवरील अधिकार नाकारले जात असतील तर त्यातही काही मदत करावी.
४) अनेक महिला कर्जबाजारी आहेत. कर्ज देणाऱ्या संस्था खूप त्रास देत आहेत.त्यात हस्तक्षेप करायला मदत करता येईल का ? गावातील शहरातील प्रतिष्ठित व्यक्तींनी मध्यस्ती करून ते कर्ज कमी करण्यासाठी/माफ करायला मदत करता येईल का ?यासाठीही प्रयत्न करावा

५)त्या कुटुंबातील मुलांना शैक्षणिक साहित्य व फी माफी मिळवून द्यावी

५)या महिलांना सहानुभूतीवर जगायला आवडत नाही तर कष्टाने स्वतः च्या पायावर उभे राहायची मानसिकता असते.त्यामुळे उद्योग व्यवसायासाठी कर्ज मिळवून देण्याचे प्रयत्न करणे, स्वयंचलित मशीन मिळवून देणे महिलांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न करावा.स्थानिक संस्थांच्या मदतीने रोजगार,नोकरी कर्ज मिळवून द्यावे
६) आपली संस्था असेल तर नवरात्र निमित्ताने या महिलांचा एकत्रित छोटा कार्यक्रम आयोजित करावा,त्यात काही मदत करावी फक्त त्याला बटबटीत रूप न येता संवाद, अनौपचारिक असे स्वरूप राहावे

*जमेल तेवढे नक्कीच करा* …
खूप वाईट स्थितीत या महिला जगत आहेत…त्यांना मदत करून देवीची पूजा बांधा…नवरात्र साजरे करा…

या महिलांना स्वतःच्या सामर्थ्याचा प्रत्यय आणून द्यायला मदत करा…

*हेरंबकुलकर्णी*
निमंत्रक
कोरोना एकल पुनर्वसन समिती महाराष्ट्र

(आपण केलेले प्रयत्न *8208589195* या whatsapp वर जरूर कळवा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here