Home महाराष्ट्र ॲक्टीवा गाडीतून रॉकेट देशी दारू जप्त…

ॲक्टीवा गाडीतून रॉकेट देशी दारू जप्त…

66

🔺ब्रम्हपुरी येथील विशेष पथकाची कार्यवाही…

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी (दि.7 ऑक्टोबर):- ॲक्टीवा गाडीतून रॉकेट देशी दारू जप्त दि. ०६/१०/२१ रोजी रात्री ११:३० वा दरम्यान पो.स्टे ब्रम्हपुरी येथील विशेष पथकास गुप्त माहीतीदाराद्वारे खबर मिळाली की ब्रम्हपुरी येथुन एका ॲक्टीवा गाडीने ग्रामीण भागात दारु वाहतुक होणार आहे.

अशा माहीतीवरून ब्रम्हपूरी टाउन येथील कबरस्थान जवळ सापळा रचून येणारी संशयीत ॲक्टीवा गाडीला थांबवले असता दोन इसम हे सदर गाडीने रॉकेट देशी दारू संत्रा कंपनीची देशी दारू प्रत्येकी ९० ml च्या सिलबंद १०० बॉटल असलेले असे ०५ बॉक्स वाहतुक करताना मिळून आले.आरोपी योगाजी उर्फ योगेश मनीराम बुंदेले वय ४० वर्ष रा हनुमान नगर ब्रम्हपुरी जि चंद्रपूर, अमर महीपाल गजभिये वय ३२ वर्ष रा भवानी वार्ड ब्रम्हपुरी जि चंद्रपूर यांचेवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ अ,८३ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गुन्हयात मिळून आलेली अवैध दारू की. ५०,००० रू व त्याचे वाहतुकीसाठी उपयोगात आणलेली ॲक्टीवा मोटरसायकल की अं ४०,००० रू असा एकूण ९०,००० रू चा मुद्येमाल गुन्हयात जप्त करण्यात आला.सदरची कारवाई मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सा ब्रम्हपुरी, मा. पोलीस निरीक्षक सा ब्रम्हपुरी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी येथील विशेष पथकाकडून करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here