Home महाराष्ट्र लायन्स क्लब गंगाखेड तर्फे आदर्श शिक्षक सत्कार सोहळा संपन्न

लायन्स क्लब गंगाखेड तर्फे आदर्श शिक्षक सत्कार सोहळा संपन्न

95

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.7ऑक्टोबर):-लायन्स क्लब गंगाखेड टाऊन च्या वतीने दिनांक 6 ऑक्टोबर रोजी शहरातील कै.शेषाबाई सिताराम मुंढे कला महाविद्यालय या ठिकाणी तालुक्यातील 15 आदर्श शिक्षकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते संतोष भाऊ मुरकुटे , उद्घाटक ऍड.आदिनाथ मुंडे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. बालाजी ढाकणे, दत्तात्रय निलपत्रेवार, कुबेर खांडेकर, लायन्स क्लबचे सर्विस चेअर पर्सन गोपाळ मंत्री, अध्यक्ष अतुल गंजेवार, सचिव गोविंद रोडे, कोषाध्यक्ष महादेव गीते आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख संभाजी वाडेवाले यांनी केले.

याप्रसंगी दैवशाला धापसे, इंदुमती कदम, ज्ञानेश्वर पेकम, दत्तात्रय तेलंग, माधुरी मुंडे, बाळासाहेब नागरगोजे, मष्णा तुडमे, दीपक गोरे, नितांजना सुगावकर, अनंत काळे ,विजय राठोड, रंगराव सुपेकर, सुरेखा महाजन, विनायक पवार, भालचंद्र गुंठे आदि 15 शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य यांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, पेन व पुष्पगुच्छ देऊन प्रमुख अतिथींच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. तर सत्काराला उत्तर देताना शिक्षकांनी लायन्स क्लब गंगाखेड प्रति आपल्या कृतज्ञतेच्या भावना व्यक्त केल्या.

अध्यक्षीय समारोपात संतोष भाऊ मुरकुटे यांनी आपल्या जीवन प्रवासाविषयी माहिती देत येणाऱ्या काळात कोणत्याही शिक्षक ,विद्यार्थी यांना लागेल ती मदत करण्याचा मानस व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाळ मंत्री तर आभार प्रदर्शन बालासाहेब यादव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भगत सुरवसे, अभिजित चौधरी, महेंद्र वरवडे, गोविंद आय्या,बालाजी कांदे, प्रा. अशोक केंद्रे,प्रा. राजीव आहेरकर, मोहन गीते, जगन्नाथ आंधळे, संजय सुपेकर, संजय तापडिया, प्रा. प्रकाश सुर्वे ,प्रकाश घण, रेणू घण, विजय जाधव,गोविंद शिंदे आदींनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचा समारोप अल्पोपहाराने झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here