Home महाराष्ट्र शेघाट येथे पाणीपुरवठा योजनेच्या माहिती पटाचे सादरीकरण !

शेघाट येथे पाणीपुरवठा योजनेच्या माहिती पटाचे सादरीकरण !

275

🔸पाणी पुरवठा योजनेसाठी 18 कोटी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार देवेंद्र भुयार यांचा नागरी सत्कार !

✒️वरुड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

वरुड(दि.7ऑक्टोबर):-वरुड तालुक्यातील शेंदुरजनाघाट नगरपरिषद येथे शहराकरिता पाणी पुरवठा योजनेकरीता आमदार देवेंद्र भुयार यांनी 18 कोटी 9 लक्ष रुपये निधीची तरतुद करून दिल्यामुळे शेघाट येथे आमदार देवेंद्र भुयार यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी शेघाट येथील पाणी पुरवठा योजनेच्या माहिती पटाचे सादरीकरण गुजरीबाजार चौक, शेंदूरजनाघाट येथे आमदार देवेंद्र भुयार यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

या पाणी पुरवठा योजनेची महत्वाची बाब म्हणजे शेंदुरजनाघाट शहरामध्ये अनेक वर्षांपासून जुनी (बिडची ) पाईपलाईन असल्यामुळे नागरिकांना दुषित पाणी मिळत होते, शेघाट येथील नागरिकांची पाणी समस्या दुर व्हावी यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी शेघाट येथील पिण्याच्या पाण्यासाठी नविन पाईपलाईन, नविन फिल्टर प्लॅन्ट, नविन पाण्याची टाकी बांधण्याकरिता राज्यशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करुन १८ कोटी ९ लक्ष रुपयांची तरतुद करुन दिल्यामुळे शेघाट येथील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

यावेळी कार्यक्रमाकरिता आमदार देवेंद्र भुयार, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष बाळू कोहळे पाटील, माजी नगराध्यक्ष जगदीश काळे, सुनीताताई वंजारी, राजश्रीताई डोईजोड, नगरसेवक जयाताई श्रीराव , माजी नगराध्यक्ष सुरेशराव बेलसरे, नगरसेवक राकेशभाऊ दवंडे, नगरसेवक भुपेंद्र कुवारे, शंकरराव बेलसरे, माजी नगरसेवक बाबासाहेब गणोरकर, उल्हास लेकुरवाळे, देवानंद जोगेकर, माजी उपाध्यक्ष लीलाधर डोईजोड, संजय डफरे, वंदना बेलसरे, सुधाकरभाऊ बेले, कय्युमभाई, आनंदराव देशमुख, बबलूभाई, शिवसेना शहर प्रमुख अजयभाऊ सरोदे काँग्रेस शहर उपाध्यक्ष प्रवीणभाऊ कुबडे, संजय बेले, विक्की जैस्वाल, रवींद्र वंजारी, मुख्याधिकारी रवींद्र पाटील, दीपक घोरपडे, गौरव गणोरकर, सतीश काळे संजयथेटे, गौस अली, स्वप्निल आजनकर, जागबीरसिंग भावे, अरुण डोईजोड, नितीन श्रीराव, कलामभाई, शेख नावेद, माजी प्राचार्य लिखितकर , राष्ट्रवादी युवककाँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नवनीत वानखडे, मनीषभाऊ बेले, निखिल वऱ्होकर, अक्षय डफरे, संदीप खडसे, प्रविण देशमुख, जगदीश लोखंडे, तसेच महाविकास आघाडी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here