Home चंद्रपूर आझाद बगीचासाठी काँग्रेसचे आंदोलन- सौंदर्यीकरण करून बगीचा नागरिकांना खुले करा

आझाद बगीचासाठी काँग्रेसचे आंदोलन- सौंदर्यीकरण करून बगीचा नागरिकांना खुले करा

100

🔸मौलाना अबुल कलाम आझाद यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.7ऑक्टोबर):-शहरातील नागरिकांच्या विरंगुळ्याचे केंद्र असलेला मौलाना अबुल कलाम आझाद बगीचा सौंदर्यीकरणाच्या नावाखाली मागील काही महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे सौंदर्यीकरणाचे काम तातडीने पूर्ण करून बगीचा नागरिकांसाठी खुला करण्यात यावा. तसेच या बगीच्यात मौलाना अबुल कलाम आझाद यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, या मागणीसाठी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्या नेतृत्वात गुरुवारी (ता. ७) सकाळी ७ वाजता बगीचाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आले.

चंद्रपूर शहराच्या मध्यवर्ती भागात मौलाना अबुल कलाम आझाद बगीचा आहे. या बगीचात शहरातील आबालवृद्ध दररोज सकाळी आणि सायंकाळी विरंगुळा म्हणून येत असतात. मात्र, मागील काही महिन्यांपासून सौंदर्यीकरणाच्या नावाने बगीचा बंद आहे. त्यामुळे बगीचाचे काम तातडीने पूर्ण करून नागरिकांसाठी खुले करण्यात यावे. तसेच मौलाना अबुल कलाम आझाद यांचे देशाच्या विकासात मोठे योगदान आहे. त्यामुळे बाबूपेठ परिसरातील गौरी तलावात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. त्याचप्रमाणे या बगीचातही मौलाना अबुल कलाम आझाद यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा. या मागण्या तातडीने मंजूर करण्यात यावा, अन्यथा चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भविष्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

त्यानंतर मागण्यांचे निवेदन महापालिका आयुक्त यांना सादर करण्यात आले. या आंदोलनात कामगार नेते के. के. सिंग, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सुनीताताई अग्रवाल, अश्विनीताई खोब्रागडे, प्रवीण पडवेकर, गोपाल अमृतकर, चंदाताई वैरागडे, नगरसेवक नीलेश खोब्रागडे, उमाकांत धांडे, नरेंद्र बोबडे, राजेश अडूर, कुणाल चहारे, सुनील पाटील, मोनू रामटेके, प्रसन्ना शिरवार, साबीर सिद्दीकी, रवी रेड्डी, भालचंद्र दानव, कुणाल रामटेके, राजेश रेवल्लीवार, राजवीर यादव, मोरेश्वर खैरे, आतिक शेख, राजू वसेकर्म काशिफ अली, नासिर कुरेशी, केतन दुरसेलवार, राजीव खजांची, आकाश सातपुते, जहीर काझी, रवी भिसे, मधुकर खोब्रागडे, यश तिवारी, नथ्यू धावंडे, शुभम कौराम, सुधाकर चन्ने, मेहमूदभाई, आरिफभाई, अशोक कामडे, सुरेश कुंदोजवार यांच्यासह काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आॅर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
——-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here