Home महाराष्ट्र आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी ना.नितीन गडकरी यांची घेतले भेट

आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी ना.नितीन गडकरी यांची घेतले भेट

89

🔹रेंगाळत असलेली कामे तात्काळ मार्गी लावण्यासाठी दिले निवेदन

🔸वनविभागाचे तांत्रिक अडचणींचा तिळा सोडविण्यासाठी धडपड

✒️राहुल डांगे(विशेष प्रतिनिधी)

अहेरी(दि.7ऑक्टोबर):- अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांची नुकतीच भेट घेऊन जिल्ह्यातील व अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रातील रस्त्यांचे रेंगाळत असलेल्या व नवीन कामांना मंजुरी मिळवून घेण्यासाठी निवेदन देऊन पाठपुरावा केले.ना.नितीन गडकरी यांनी निवेदनाची तात्काळ दखल घेऊन सविस्तर व सकारात्मक चर्चा केले.

त्याचीच परिणीती म्हणून रेपनपल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाले असून प्रयत्न व पुढाकार घेतल्याने आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी मंगळवार 5 ऑक्टोबर रोजी रेपनपल्ली येथे नारळ फोडून कामाला सुरुवात करायला लावले.

पहिल्या टप्प्यात रेपनपल्ली ते सिरोंचा रोड दुरुस्तीला सुरुवात झाले असून आलापल्ली ते सिरोंचा रोडच्या नूतनीकरणाच्या कामासाठी वनविभागाची तांत्रिक अडचणी येत असल्याने वनखात्याचे मंत्री व वरिष्ठ अधिकारी यांच्याशी बातचीत करून तांत्रिक अडचणींचा तिळा सोडविण्यासाठी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांची धडपड सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here