Home महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडीची अकोल्यात सत्ता कायम बीडमध्ये आनंदोत्सव साजरा

वंचित बहुजन आघाडीची अकोल्यात सत्ता कायम बीडमध्ये आनंदोत्सव साजरा

48

✒️विशेष प्रतिनिधी(समाधान गायकवाड)

बीड(दि.६ऑक्टोबर):-वंचित बहुजन आघाडी चा अकोला पॅटर्न आजही कायम आहे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे सध्या घरीच आहेत त्यांच्या गैरहजेरी मध्ये वंचित बहुजन आघाडी च्या प्रभारी प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अकोला जिल्हा परिषद पंचायत समिती पोटनिवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी ला घवघवीत यश मिळाले आहे.

या यशामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर व राज्याची सर्व टीम यांची महत्त्वपूर्ण कामगिरी आहे, ॲड.प्रकाश आंबेडकर यांची ताकद अकोल्यातील जनतेचं मताच्या स्वरूपातून पुन्हा एकदा या ठिकाणी दिसून आली आहे.

त्यामुळे बीड जिल्हा वंचित बहुजन आघाडी बीड च्या वतीने बीड नगर रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन या ठिकाणी फटाके फोडून व पेढे वाटून मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव साजरा करण्यात आला यामध्ये जिल्हा उपाध्यक्ष संतोष जोगदंड, युनूस शेख, राजू कवठेकर, संदिप जाधव, विश्वजीत डोंगरे,अजय साबळे, उमेश तुळवे, जिल्हा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here