Home गडचिरोली आय.टी.आय. प्रवेशासाठी समुपदेशन फेरी ची सुवर्ण संधी

आय.टी.आय. प्रवेशासाठी समुपदेशन फेरी ची सुवर्ण संधी

42

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.6ऑक्टोबर):-आजवर झालेल्या पहिल्या चार प्रवेश फेरीमध्ये ज्या उमेदवारांना कोणत्याही व्यवसायात प्रवेश मिळाला नाही अश्या उमेदवारांनी दि.७ सप्टेंबर ते ७ आक्टोंबर या दरम्यान नव्याने अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना संस्थास्तरावर समुपदेशन प्रवेश फेरीद्वारे शेवटची संधी उपलब्ध करून दिलेली आहे.दि. १० आॕक्टोंबर ते १२ आॕक्टोंबर या दरम्यान संस्थास्तरीय समुपदेशन प्रवेश फेरीसाठी आपल्या खात्यामध्ये लाॕग इन करून जवळच्या शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रत्यक्ष जावून रजिस्ट्रेशन क्रमांक सांगून संस्था निवड करून हजेरी नोंदवावी.

दि.१३ आॕक्टोंबर रोजी सांयकाळी ५ वाजेपर्यंत गुणवत्ता यादीनुसार मेसेज द्वारे प्रवेशासाठी दिनांक- वेळ व संस्थेचे ठिकाण कळविण्यात येईल.उमेदवारांना मेसेजद्वारे प्राप्त झालेल्या उमेदवारांनी दि.१४/१०/२१ ते १७/१०/२१ या कालावधीत सकाळी ८ वाजता हजर रहावे. जागा उपलब्ध असल्यास उमेदवारांच्या मेरीटनुसार त्यानुसार प्रवेश मिळेल. तसेच प्रवेशासाठी येताना स्वतःचे मूळ कागदपत्र / प्रमाणपत्र (छायांकित प्रती २ संचासह ) ,प्रवेश फि रक्कम व २ पासपोर्ट फोटो सोबत आणणे आवश्यक आहे. औ.प्र.संस्थेच्या प्रवेशासाठीची ही संस्थास्तरावरची शेवटची संधी असल्याने प्रवेशासाठी इच्छूक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा ,असे आवाहन गडचिरोली औ.प्र.संस्थेचे प्राचार्य संतोष सांळुके यांनी केलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here