Home महाराष्ट्र आपल्या मुलाची चांगली (मंगलवाचक) नावे ठेवणे हा गंभीर गून्हा ? – दादासाहेब...

आपल्या मुलाची चांगली (मंगलवाचक) नावे ठेवणे हा गंभीर गून्हा ? – दादासाहेब शेळके

75

✒️अमोल उत्तम जोगदंडे(विशेष प्रतिनिधी)

उमरखेड(दि.6अक्टोम्बर):- अस्पृश्य अर्थात दलित शूद्र यांच्या मुलाची चांगली नावे ठेवणे हा गंभीर असून त्यासाठी कठोर शिक्षाही होती.असे प्रतिपादन भीम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके यांनी सोशल मीडिया यवतमाळ जिल्हा प्रमुख सिद्धार्थभाऊ दिवेकर यांच्या मुलीच्या दिदि “सावी” हिचा नामकरण व वाढदिवसा निमित्त प्रमुख मार्गदर्शक म्हणून बौद्ध विहार आंबेडकर वार्ड ,उमरखेड येथे बोलताना व्यक्त केले.

यावेळी भिम टायगर सेना जिल्हा संपर्कप्रमुख राष्ट्रपाल दादा सावतकर, जिल्हा प्रवक्ते गौतमदादा वाठोरे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुधाकरभाउ कांबळे, लिलाबाई हटकर, कैलासदादा कदम आदी उपस्थित होते.यावेळी पुढे बोलताना दादासाहेब शेळके म्हणाले की इतिहासाची पडताळणी केल्यानंतर भारतीय संविधानाच्या अगोदर मनुस्मृती नावाचे संविधान होते.
त्या मनुस्मृती मध्ये प्रत्ये काचे मूलभूत कर्तव्य सांगितलेले होते.

त्यापैकी मनुस्मृती प्रणीत चार वर्णां मध्ये मध्ये ब्राह्मण,क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांच्या लेकराची नावे कशी यांचे नियम सांगितले होते.

ते नियम जर मोडले तर कठोर शिक्षा असे.तो नियम असा
कलम क्रमांक (अध्याय) 2 /31 मध्ये सांगितले
१1) मांगल्य ब्राह्मण! अर्थात ब्राह्मणाची नावे मंगल वाचक असावीत.

उदा.1) प्रज्ञावंत 2) गुणवंत 3) बुधवंत
2) स्या त्क्षत्रीयस्य बलान्वीतम! अर्थात क्षेत्रीयांची नावे बल सूचक असावी.

उदा. 1) विक्रम 2) क्रांतिवीर 3) बलवंत

3) वैश्यस्य धन संयुक्त !
अर्थात वैश्याची नावे धनवाचक असावीत.

उदा. 1) धनंजय 2) लक्ष्मीकांत तर 3) शूद्रस्यतु जुगुप्सतम! शुद्राची नावे निंदनीय आणि शुद्रा विषयी घृणा आणि तिरस्कार निर्माण करणारे असावे.

उदा.1) कोंडबा 2) धोंडबा 3) उकंडू पण या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान लागू झालं तेव्हा पासून भारतीय संविधान भाग 3 फंडामेंटल राईट अर्थात मुल भूत हक्कांमध्ये आर्टिकल 18 नुसार मनुस्मृती व मनुवाद्यांची नावे ठेवण्याच्या बाबतीत ची जी सर्व मक्तेदारी मोडीत काढली आहे.आज भारतीय संविधान भाग 3 fundamental right‌‌‌‌ मूलभूत हक्क मधील आर्टिकल 19 नुसार आम्ही काय खावे, आम्ही काय बोलावे, आम्ही काय लिहावे काय घालावे व आम्ही आमच्या लेकराचे काय नाव ठेवावे हा संविधानाने दिलेला आमचाच अधिकार असून दीदी “सावी” चे नाव तिचे आई-वडील तिच्या इच्छे नुसार ठेवु शकले याला कारणीभूत भारतीय संविधानच आहे.पण संविधान आज मनुवादी विचारांनी जर्जर झाले लोक धोक्यात आणण्याचे काम करत असून अशा लोकांचा वेळीच बंदोबस्त करण्याचे काम आपल्या सर्वांनी करायचा आहे. असे ते शेवटी म्हणाले.

सूत्रसंचालन भीम टायगर सेनेचे उमरखेड तालुका संपर्क प्रमुख कुमार केंद्रेकर यांनी केले तर आभार ,प्रफुल दिवेकर नितीन आठवले यांनी मानले यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here