Home महाराष्ट्र नेर शिवारात अचानक झालेल्या पावसामुळे म्हाशीचा मृत्यू

नेर शिवारात अचानक झालेल्या पावसामुळे म्हाशीचा मृत्यू

268

✒️विशेष प्रतिनिधी(संजय कोळी)

धुळे(दि.6ऑक्टोबर):- तालुक्यातील नेर येथील राजेंद्र शिवरम कोळी यांचे शेतात म्हशी चरण्यासाठी सोढलेल्या होत्या अचानक ढगांचा गडगडाट आवाज करत विजा कडाडल्या व जोरचा पावसामध्ये सापडल्याने म्हशीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे असून मृत्यू पावलेली म्हशीला देखील दोन दिवसाचे लहान पारडु होते.नेर येथील महाकाळी पांढरी शेत शिवारात ही घटना घडली आहे.

तसेच ऑगस्ट महिन्यात पहिल्या बैलाचा अचानक पणे मृत्यू झाला होता.तसेच गेल्या मागच्या ऑक्टोंबर महिन्यात दुसरा बैलाचा सर्पदंशने देखील मृत्यू झाला होता. तसेच आशा घटना वारंवार घडत असल्याने यामुळे शेतकरी राजेंद्र शिवराम कोळी यांना भरपाई ची मागणी केली आहे.तसेच ६० ते ७० पशुधन नुकसान झाले आहे. आधीच संकटात असताना आसमानी आणी सुलतानी संकटाने शेतकरी राजा हताश झाला आहे.

Previous articleश्रमदानातून बांधला वनराई बंधारा
Next articleअहेरी-चंद्रपुर मार्गावरील अज्ञात वाहनाचा धडकेत बिबट ठार;झरण वनपरिक्षेत्रातील घटना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here