Home महाराष्ट्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहर सरचिटणीस भूपेंद्र मोरे यांच्या तर्फे मोफत लसीकरण...

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहर सरचिटणीस भूपेंद्र मोरे यांच्या तर्फे मोफत लसीकरण शिबिरास नऱ्हे येथे उस्फुर्त प्रतिसाद

71

✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पुणे(दि.6ऑक्टोबर):-राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहर सरचिटणीस व शिवराज्य समूहाचे संस्थापक अध्यक्ष भूपेंद्र मोरे यांच्यातर्फे महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त दोन ऑक्टोबर 2021रोजी नऱ्हे येथील ग्रीन कमर्शियल स्पेस येथे मोफत लसीकरण शिबिराचे आयोजन सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत करण्यात आले होते. या या शिबिरा शिबिराच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप ,खडकवासला मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसचे निरीक्षक दीपक मानकर उपस्थित होते.

याप्रसंगी पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश हांडे,राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर उपाध्यक्षा स्वाती पोकळे, हवेली पंचायत समितीच्या माजी सभापती प्रभावती भूमकर, सामाजिक कार्यकर्ते निलेश चाकणकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर उपाध्यक्षा राजश्री पाटील, सुरेखा पवार, प्रफुल्ल चाकणकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहर सरचिटणीस व शिवराज्य समूहाचे संस्थापक अध्यक्ष भूपेंद्र मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. कोव्हिड-19 च्या 1100 डोसचा संकल्प एका दिवसात करण्याचा मानस या उपक्रमाद्वारे करण्यात आला होता.

यावेळी 1125 जणांचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये 200 आशा समाजसेविकाचेही लसीकरण करण्यात आले. अशा प्रकारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहर सरचिटणीस भूपेंद्र मोरे यांच्यातर्फे नऱ्हे गाव 100% लसीकरण करण्याची मोहीम राबविण्यात आली. या मोफत लसीकरण शिबिरास नऱ्हे येथील नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. या लसीकरण मोहिमेसाठी ॲक्ट व हक्कदर्शक संस्थेचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here