Home धार्मिक  आजपासून जागर आदिशक्तीचा प्रवचन महोत्सवास प्रारंभ

आजपासून जागर आदिशक्तीचा प्रवचन महोत्सवास प्रारंभ

67

🔹संतचरित्र गृपच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने महोत्सवाचे ६ वे पर्व

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.6ऑक्टोबर)-:महाराष्ट्र राज्य ही संतांची भूमी असून साधू संतांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणे काळाची गरज आहे. या अध्यात्मिक विचाराने प्रेरित होउन संत चरित्र गृप व तमाम ऑनलाइन भक्तिविधाते सज्जन मायबाप, बंधू भगिनींच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि.०७ पासून दररोज रात्री ७.३० ते ८.३० या वेळेत शारदीय नवरात्रौत्सवा निमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान नेवासा अध्यक्ष तथा गुरुवर्य शिवाजीराव देशमुख, प पु डॉ नारायण महाराज जाधव (आळंदी) यांच्या मार्गदर्शनाखाली व भागवतानुरागी कविताताई साबळे, माऊली कन्या हभप दिपाली ताई घोडके यांच्या संकल्पनेतून हभप शारदाताई सूर्यवंशी व डॉ सौ लताताई पाडेकर (पुणे) यांच्या कुशल नियोजनात जागर आदिशक्तीचा प्रवचन महोत्सवास ऑनलाईन पद्धतीने प्रारंभ होणार असल्याची माहिती संतचरीत्र गृप महाराष्ट्र प्रसिद्धीप्रमुख तथा केंद्रीय पत्रकार संघाचे संघटक पञकार रामभाऊ विठ्ठलराव आवारे (सर) वनसगाव यांनी दिली आहे.

अखंड महाराष्ट्रभर झूम ॲपद्वारे ऑनलाईन पद्धतीने सुरू होणाऱ्या या महोत्सवासाठी महाराष्ट्रातील आळंदी,नेवासा, शेवगाव,बीड, परभणी, सातारा, सांगली, शेगाव, नासिक, निफाड ,धुळे ,श्रीरामपूर ,अहमदनगर, पाथर्डी,फलटण आदी जिल्ह्यातील ११ नामवंत महिला रामायणाचार्य, भागवताचार्य, प्रवचनकार, कीर्तनकार मंडळींनी महोत्सवात सहभाग नोंदवला आहे.

जागर आदिशक्तीचा प्रवचन महोत्सवात सहभागी झालेले पारमार्थिक नामवंत महिला व चिंतनाचा विषय याप्रमाणे–
०७ ऑक्टोबर २०२१ भागवताचार्य हभप वर्षाताई महाराज काळे- कोकाटे (बीड), आई तुळजाभवानी माता तुळजापुर,०८ऑक्टोबर ह.भ.प. अलकाताई महाराज रानडे (सिन्नर), आई सप्तश्रुंगी माता वणी (दिंडोरी), ०९ ऑक्टोबर ह भ प डॉ सौ लताताई पाडेकर (पुणे),माहुरची रेणुकामाता माहुरगड, १०ऑक्टोंबर ह-भ-प सुलोचनाताई सुलताने खामगाव (बुलढाणा),आई अंबाबाई अमरावती, ११ ऑक्टोबर हभप.मीनाताई महाराज मडके (शेवगाव), मोहटादेवी पाथर्डी, १२ऑक्टोंबर हभप सिमाताई महाराज काळे (चांदवड), कालिका माता व रेणुका माता चांदवड,१३ ऑक्टोबर हभप भागवतानुरागी कविताताई साबळे (कोपरगाव), एकवीरा देवी कार्ले, १४ ऑक्टोबर ह.भ.प.कांताताई महाराज सोनटक्के ( जामखेड) जोगेश्वरी माता, १५ ऑक्टोबर ह भ प माऊली कन्या दिपाली ताई घोडके वाघोली (पुणे), जागर आदिशक्तीचा प्रवचन महोत्सव, समारोपीय काला किर्तन वाघोली (पुणे),वेळ सकाळी १० ते १२, रात्री ७.३०ते ८.३० वेळेत हभप सुनंदाताई जोशी (पुणे),कोल्हापुरची महालक्ष्मी माता याप्रमाणे चिंतन होणार आहे.

कार्यक्रमाबाबत अधिक माहितीसाठी रामभाऊ आवारे (सर) संतचरीत्र ग्रुप महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख संपर्क नंबर – 8788504512, हभप ज्ञानेश्वर माऊली सोनवणे संत चरित्र ग्रुप निर्माता संपर्क नंबर 7410139393 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन भागवताचार्य दिपाली ताई घोडके (पुणे) व महोत्सवाच्या मुख्य संचालिका भागवतानुरागी हभप कविताताई साबळे कोपरगाव यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here