Home महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत संवर्ग कर्मचारी संघटनेच्या वतीने संपाची हाक

महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत संवर्ग कर्मचारी संघटनेच्या वतीने संपाची हाक

95

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.6ऑक्टोबर):-महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत संवर्ग कर्मचारी संघटनेच्या वतीने गंगाखेड नगर परिषद मधील कर्मचाऱ्याच्या प्रलबीत मागण्या संघटनेच्या वतीने दिनांक 21जुलै 2021,28आगस्ट 2021, रोजी दिले असता आपल्या करयालयाचा करार दिनांक 30आगस्ट रोजीमागण्या मान्य केल्या होत्या परंतु आपल्या कार्यालयच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या संदर्भात कसल्याही प्रकार ची मागणी अद्याप मान्य न केल्या मुळे सर्व कर्मचाऱ्यांच्या मनात आपल्या कार्यालयच्या बाबत असंतोष निर्माण होताना दिसत आहे कारण कि आपल्या कार्यालयच्या समोर उपोषण केले.

वारंवार निवेदन देऊन विचारणा केली परंतु नगर परिषद कार्यालय गंगाखेड च्या प्रशासनकडून एकच ब्रीद वाक्य ठरल्या प्रमाणे निधी उपलब्ध झाल्या नंतर देण्यात येईल, हेच उत्तर मिळाले. परंतु आपल्या कार्यालयात निधी येतो तसाच तो खर्च केला जातो.परंतु कर्मचाऱ्यांच्या मागण्या कडे डोळेजाक केले जाते.सध्या दसरा व दिवाळी सारखे सण येत असून प्रलंबित मागण्याचा सकारात्मक निर्णय घेण्यात यावा यासाठी दिनांक 04सप्टेंबर 2021रोजी मा. मुख्याधिकारी नगर परिषद गंगाखेड यांना लेखी निवेदनद्वारे मागण्या मान्य करण्यासाठी निवेदन देण्यात आले असून या मागण्या खालील प्रमाणे देण्यात आले आहे.

1) कार्यालयच्या वतीने कार्यरत व सेवानिवृत कर्मचारी यांचे सातवा वेतन आयोगातील फारकाची रक्कम देणे संबधी न. प. फंडातनिधी जमा झाल्यानंतर सर्व कर्मचारी यांना समान हप्त्यात्या मध्ये समान दिली जाईल असे मान्यकरण्यातआलेहोते. 2 )सेवानिवृत कर्मचाऱ्याचे सेवा उपदानाची, रजा रोखीकरणाची रक्कम सर्व कर्मचाऱ्यांना समान हप्त्यात अदा केली जाईल असे मान्य करण्यात आले होते. 3)2005च्या आकृती बंधानुसार बिंधूनामावली प्रक्रिया अद्यावत करून मागासवर्गीय कर्मचारी यांचा अनुशेष भरण्याबाबत ची कार्यवाही करण्यात येईल असे मान्य करण्यात आले. 4)उच्च शैक्षणिक अहर्ता धारण करणाऱ्या सफाई कामगारांना स्थायी निर्देश व शासकीय परीपत्रका नुसार मुद्दतीत कार्यवाही करण्यात येईल असे मान्य करण्यात आले. 5)कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सहाव्या वेतानाचे थकीत रक्कम नगर परिषद ची दैनंदिन वसुली झाल्यानंतर समान हप्त्यात प्रदान केली जाईल असे मान्य केले होते.

तसेच नगर परिषद कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगापोटी एक हप्या अदा करण्यात यावा वरील सर्व मागण्या आर्थिक स्वरूपाच्या आपल्या कार्यलयच्या वतीने 15सप्टेंबर2021पर्यन्त मान्य न केल्यास 20सप्टेंबर2021रोजी नगर परिषद कार्यालयाचे कर्मचारी संपावर जातील असे निवेदन महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत संवर्ग कर्मचारी संघटने चे राज्य उप अध्यक्ष श्री भ. ना. बोडके यांच्या स्वाक्षरी निवेदन देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here