



✒️नवनाथ पौळ(अंबाजोगाई,विभागीय प्रतिनिधी)मो:-8080942185
बीड(दि.6ऑक्टोबर):-जिल्ह्यातील केज तालुक्यातील
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढाकेफळ या शाळेतदि.5 ऑक्टोबर, मंगळवार रोजी मोफत सॅनिटायझर आणि मास्क चे वाटप करण्यात आले. शिक्षण प्रेमी नागरिक तथा
माजी सरपंच श्री. भाऊसाहेब घाडगे आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा सौ. छायाताई भाऊसाहेब घाडगे यांनी स्वतःच्या खर्चातून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मास्क आणि सॅनिटायझर खरेदी केले .इयत्ता पाचवी ते इयत्ता सातवी च्या सर्व विद्यार्थ्यांना सॅनिटायझर आणि मास्क चे मोफत वाटप करण्यात आले.
तसेच शालेय पोषण आहार कामगार यांनाही
सॅनिटायझर व मास्क चे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी कोरोना या आजाराची भीती न बाळगता, दररोज शाळेत उपस्थित राहावे तसेच शाळेत आल्यानंतर पूर्णवेळ मास्क वापरणे,सोशल डिस्टंसिंग पाळणे,वारंवार साबणाने हात धुणे ही काळजी सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावी.असे आवाहन शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा सौ. छायाताई भाऊसाहेब घाडगे यांनी केले.
शाळेबाबत असलेल्या अडचणी श्री चंद्रकांत चाटे सर (मुख्याध्यापक) यांनी मांडल्या माजी सरपंच श्री भाऊसाहेब घाडगे यांनी सर्व अडचणी जाणून घेतल्या आणि त्या सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिले.तसेच यावेळी शासनाने दिलेल्या मोफत पाठ्यपुस्तकाचे वाटप ही करण्यात आले.शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद यांनी भाऊसाहेब घाडगे व सौ . छायाताई भाऊसाहेब घाडगे यांचे आभार मानले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री चाटे सर (मुख्याध्यापक) व तरकसबंद सर यांनी विशेष प्रयत्न केले. याप्रसंगी शाळेतील शिक्षिका श्रीम. नेहरकर मॅडम, श्रीम. मोराळे मॅडम ,श्रीम. साखरे मॅडम व श्रीम. कदम मॅडम या उपस्थित होत्या. भाऊसाहेब घाडगे यांनी विद्यार्थ्यांसाठी राबवलेल्या या उपक्रमाचे सर्व पालक वर्गातून कौतुक करून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.


