Home महाराष्ट्र उजनी धरण आणि हिप्परगा तलाव पूर्णपणे भरले असूनही महापालिकेतील भाजपच्या नियोजनशून्य कारभारामुळे...

उजनी धरण आणि हिप्परगा तलाव पूर्णपणे भरले असूनही महापालिकेतील भाजपच्या नियोजनशून्य कारभारामुळे सोलापूरवासी तहानलेलेच :- आ. प्रणिती शिंदे

56

🔸शिवाजी नगर बाळे येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश

✒️जगदीश का. काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७

साेलापुर(दि.6ऑक्टोबर):-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सोलापूर शहरातील शिवाजी नगर बाळे परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नवनाथ धाकफाडे, सागर जाधव, रमेश रजपूत, शरद बाबलसुरे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.

यावेळी शहर उत्तर विधानसभा युवक कॉंग्रेस उपाध्यक्ष पदी नवनाथ धाकफाडे, शहर उत्तर विधानसभा युवक कॉंग्रेस सरचिटणीस पदी सागर जाधव, वार्ड अध्यक्षपदी रमेश रजपूत, वार्ड उपाध्यक्ष पदी शरद बाबलसुरे यांची निवड करण्यात आली त्यांचे निवडीचे पत्र आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते देऊन त्यांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

यावेळी सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश वाले, जेष्ठ नेते सुधीर खरटमल, गटनेते चेतनभाऊ नरोटे, सोलापूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस सरचिटणीस विनोद भोसले, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस सरचिटणीस सुमीत भोसले, दक्षिण सोलापूर युवक अध्यक्ष सैफन शेख, नागनाथ क्षीरसागर, सुरेश पाटील, बाळासाहेब माथूर, विश्वनाथ पाटील, सुनील भोसले, बाबाराज भोसले, बाबुराव तोडकरी, मारुती तोडकरी, बंडू वाळके, अझीम शेख, निलेश व्हटकर, रवींद्र शिंदे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाले की, आज तळागाळात काम करणारे शिवाजी नगर बाळे परिसरातील युवक कॉंग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत त्यांचे मी स्वागत करते. कॉंग्रेस पक्ष हा घरोघरी व मनोमनी जाऊन सर्वसामान्य जनतेचे कामे करणारा पक्ष आहे. काँग्रेसची सत्ता महापालिकेत असताना सर्व मूलभूत सोयीसुविधा व्यवस्थितपणे मिळत होत्या. पण केंद्रात मोदींना आणि सोलापूर महापालिकेत भाजपला संधी दिली. पण त्यांना त्यांनी दिलेले एकही आश्वासन पूर्ण करता आले नाही. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, खाद्य तेलाचे दर प्रचंड वाढले, महागाई वाढली. सोलापूर महापालिकेत सुद्धा कामाच्या नावाने बोंब असून गटातटाचे भांडणात व्यस्त आहेत उजनी धरण आणि हिप्परगा तलाव पूर्णपणे भरले असूनही म्हापालिकेतील भाजप पदाधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे सात ते आठ दिवसाआड पाणी सोलापूर वासीयांना मिळत आहे. ही परिस्थिती जर बदलायची असेल तर कॉंग्रेस पक्षाला सेवेची संधी द्या महापालिका निवडणुकीत साथ द्या असे विचार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here