Home महाराष्ट्र प्रभू विश्वकर्मांचा अवमान करणाऱ्या आमदार मंत्र्यावर कारवाई करा- सामाजिक कार्यकर्ते शिवानंद पांचाळ...

प्रभू विश्वकर्मांचा अवमान करणाऱ्या आमदार मंत्र्यावर कारवाई करा- सामाजिक कार्यकर्ते शिवानंद पांचाळ नायगांवकर यांची मागणी

314

✒️नायगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नायगांव(दि.६ ऑक्टोंबर):-नायगांव बाजार भगवान विश्वकर्मा यांचा अवमान करणाऱ्या आमदार व कॅबिनेट मंत्रीविरुद्ध कारवाई करा अशी मागणी नायगांव येथील सामाजिक कार्यकर्ते शिवानंद दत्तात्रय पांचाळ यांनी नायगांव तहसिलदारामार्फत लेखी निवेदनाद्वारे थेट पंतप्रधानाकडे केली आहे, दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की भगवान विश्वकर्मा पूजा दिनी बिहार बीस्पी विधानसभा क्षेत्राचे आमदार हरीभूषण ठाकुर यांनी भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेवर मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा मुखवटा लावून मोदी शरणम् गच्छामि असा नारा देऊन पुजा केली, यावेळी बिहार सरकारचे उद्योग मंत्री सय्यद शहानवाज हुसेन यांनी देखील सदर कृत्य केले.

आमदार हरीभूषण ठाकूर यांचे हे कृत्य‌ अतिशय निंदनीय व भगवान विश्वकर्मा‌ यांचा अवमान करणारे आहे, म्हणून आमदार व मंत्र्यांने‌ त्वरित माफी मागावी, तसेच‌ संपूर्ण विश्वकर्मा समाजाप्रती देश विदेशामध्ये असलेल्या लोकांची व त्यांच्या श्रद्धा आदरभाव असलेल्या सृष्टीनिर्माता भगवान विश्वकर्मा यांची देखील माफी मागावी, अशा आमदारावर व मंत्र्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व बीजेपी चे अध्यक्ष जे.पी नड्डा‌ यांनी त्वरित कारवाई करावी. तसेच समस्त विश्वकर्मिय समाजाच्या धार्मिक भावनांचा आदर राखावा.अशी दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

दिलेल्या निवेदनाची माहितीस्तव प्रत नायगांव पोलीस स्टेशनला ही देण्यात आलेली आहे, यावेळी सामाजिक कार्यकर्ते- शिवानंद पांचाळ नायगांवकर म्हणाले की सदरील निवेदनाचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी गांभीर्यपूर्वक विचार करून लवकरात लवकर तातडीने कारवाई करावी, अन्यथा संपूर्ण विश्वकर्मिय समाज बांधव रस्त्यावर उतरून या विरोधात निषेध मोर्चा काढेल, असा इशाराही आमच्या प्रतिनिधीशी बोलताना पांचाळ यांनी दिला आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here