Home महाराष्ट्र संस्थाचालकाच्या जावया कडून मुख्याध्यापकांना अमानुष मारहाण

संस्थाचालकाच्या जावया कडून मुख्याध्यापकांना अमानुष मारहाण

225

🔺दमपुर मोहदा आश्रमशाळेची घटना

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.6ऑक्टोबर):-जिवती वरून ५ ते ६ कोलोमीटर अंतरावर असलेल्या श्रीमती पन्नाबाई माध्यमिक खाजगी आश्रम शाळा,दमपुर मोहदा येथील मुख्याध्यापक,हनुमंतू गंगाराम चुक्कलवार (४९) यांना संस्थापकाचे जावई तथा सदस्य यांनी अमानुषरित्या मारहाण केल्याची घटना काल घडली.सविस्तर वृत्त असे हनुमंतू गंगाराम चुक्कलवार (४९) हे श्रीमती पन्नाबाई माध्यमिक खाजगी आश्रम शाळा, दमपूर मोहदा या शाळेवर सन २०१३ पासून शिक्षक म्हणून तर सन २०१६ पासून मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. काल दिनांक ०४ ऑक्टोंबर २०२१ ला दुपारी ०२:३० वाजता सूर्यकांत देविदास राठोड संस्थाचालकाचे जावई व संस्थेचे सदस्य व त्यांचा मुलगा कारने आश्रम शाळेत आले आणि वर्ग १० मध्ये गेले वर्गात शिक्षक पद्माकर बाबुराव हिवरकर हे शिकवत होते.

नेहमी प्रमाणे ०३:०० वाजता शाळा सुटल्याणानंतरही वर्ग १० सुटला नाही म्हणून मुख्याध्यापक या नात्याने रामदास किसन राठोड, शिक्षक याना घेऊन वर्ग १० मुख्याध्यापक हनमंतु चुक्कलवार गेले आणि पावसाचे दिवस आहेत पाऊस येण्याची शक्यता आहे असे सांगून वर्ग सोडण्याची विनंती सूर्यकांत देविदास राठोड संस्थाचालकाचे जावई व संस्थेचे सदस्य यांना केली मात्र त्यांनी अभद्र भाषेत विद्यार्थ्यांसमोर शिवीगाळ केली, तू कोण म्हणणार, मी संस्थाचालक आहे , तू वर्गाच्या बाहेर जा निलंबीत करेन असे उद्धट भाषेत बोलले तेंव्हा मुख्याध्यापक हनमंतु चुक्कलवार सांगितले की शाळेचा मुख्याध्यापक या नात्याने विध्यार्थी सुखरूप घरी पोहोचले पाहिजे म्हणून विदयार्थ्यांना घरी जाण्यास सांगितले आणि ते पण विद्यार्थ्या मागे वर्गाबाहेर निघत असताना मागून सूर्यकांत देविदास राठोड यांनी पाठीत मारले तेंव्हा मुख्याध्यापक विद्यार्थ्यांसमोर खाली पडले.

तरी सूर्यकांत राठोड व त्यांचा मुलगा अंकित सूर्यकांत राठोड यांनी मारहाण केली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर जवळ असलेल्या लोखंडी बेंच ने कपाळावर मारहाण केली त्यात ते रक्तबंबाळ झाले.आरडा ओरड चा आवाज ऐकून शाळेतील सर्व शिक्षक धावत आले त्यामधील अमोल राठोड, रामदास राठोड, पद्माकर हिवरकर यांनी त्यांना बाजूला सारले. तेंव्हा ही जीवे मारण्याची धमकी सूर्यकांत देविदास राठोड यांनी मुख्याध्यपक यांना दिली. शिक्षकानी उपचाराकरिता व तक्रार करिता जिवती येथे आणले.

असे मुख्याध्यापक यांच्या तोंडी रिपोर्ट मध्ये नमूद आहे.
सूर्यकांत राठोड व अंकित राठोड यांच्या विरुद्ध मुख्याध्यापक हनुमंतु चुक्कवार यांच्या तक्रारीवरून जिवती पोलिस स्टेशन येथे भारतीय दंड संहिता कलम २२३, ३२४, ५०४, ५०६ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सचिन जगताप ठाणेदार यांची चमू करीत आहे.मुख्याध्यापक हनमंतू चुक्कलवार यांना अमानुष मारहाण केल्याबाबत जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ, चंद्रपूर यांचे कडून जाहीर निषेध करण्यात आला आहे. मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी मुख्याध्यापक संघाकडून करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here