Home महाराष्ट्र सुदामभाऊ राठोड यांची जय विदर्भ पार्टीच्या चंद्रपूर जिल्हा प्रभारी पदी नियुक्ती

सुदामभाऊ राठोड यांची जय विदर्भ पार्टीच्या चंद्रपूर जिल्हा प्रभारी पदी नियुक्ती

82

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.5ऑक्टोबर):- विदर्भ राज्य आंदोलन समिती हे स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी 2012 पासून सतत आंदोलने करीत आहे आणि विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी विदर्भवाद्यांना सोबत घेऊन राजकीय पार्टी ची घोषणा केली आहे. जय विदर्भ पार्टी आता स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी लढणार आहे.

02 ऑक्टोबर 2021 ला या पार्टीची पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेमध्ये पार्टीचे संस्थापक श्री. राम नेवले यांनी विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडीचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष सुधामभाऊ राठोड यांची जय विदर्भ पार्टी चंद्रपूर प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली, नियुक्ती बद्दल चौफेर अभिनंदन केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here