Home क्राईम खबर  गंगाखेड शहरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत धाड एक जण जाळ्यात

गंगाखेड शहरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत धाड एक जण जाळ्यात

36

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.5ऑक्टोबर):-दुय्यम निबंधक कार्यालय गंगाखेड या ठिकाणी जमीन व प्लॉटची खरेदी विक्री करण्यासंदर्भात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत असतो. पैशाची देवाणघेवाण करून काम करण्याचा प्रकार होत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत दिनांक 4 ऑक्टोबर रोजी दुय्यम निबंधक कार्यालय गंगाखेड याठिकाणी प्रभारी दुय्यम निबंधक किसन सखाराम लवंदे हा दोन हजाराची लाच मागितल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग परभणी यांनी त्यांना सापळा रचून पकडले.

तक्रारदार यांची रजिस्ट्री करण्यासाठी 18 ऑगस्ट 2021 रोजी लाचेची मागणी केली असता त्यांना दिनांक 4 ऑक्टोबर रोजी दोन हजाराची लाचेची मागणी केली आस्था त्यांनी लाच देण्यास गेली असता मी तुम्हाला ओळखत नाही असे म्हणून पैसे घेण्यास नकार दिला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा सापळा यशस्वी करण्यात भारत के. हुंबे पोलीस उपनिरीक्षक, पोलीस नाईक अनिल कटारे ,पोलीस शिपाई माणिक चट्टे, सचिन धबडगे, चालक जनार्दन कदम व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग परभणी यांची प्रमुख भूमिका बजावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here