Home महाराष्ट्र रोजी डोंगरी जन परिषदेच्या वतीने भव्य धरणे आंदोलन

रोजी डोंगरी जन परिषदेच्या वतीने भव्य धरणे आंदोलन

70

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.5ऑक्टोबर):-दि.०४.१०.२०२१ सोमवार रोजी डोंगरी जन परिषदेच्या वतीने डोंगर भागातील शेतकऱ्यांचे सरसगट हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी या मागणीसाठी गंगाखेड तहसील कार्यालय समोर भव्य धरणे आंदोलन गंगाखेड तालुक्यातील डोंगर भागातील माकणी पिंपळदरी राणीसावरगाव या महसूल मंडळात प्रचंड प्रमाणात तुफान अतिवृष्टीमुळे सर्वात्र पाणी पाणी होवून सोयाबीन कापूस आदी पीके मातीमोल झाले.

असुन डोंगर भागातील जमीनी खरडुन गेल्या आहेत डोंगर भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान खरीपाच्या पिकावरच अवलंबून असते व खरीप हंगामातील पिके पाण्याखाली गेल्या मुळे डोंगर भागातील शेतकऱ्यांना जीवन जगणे मुश्किल झाले असुन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची सरसगट हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी या मागणीसाठी डोंगर भागातील शेतकऱ्यांचे डोंगरी जन परिषदेच्या वतीने गंगाखेड तहसील कार्यालय समोर भव्य धरणे आंदोलन करण्यात येवून तहसीलदार यांचे मार्फत मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.

असुन या आंदोलनात डोंगरी जन परिषदेचे मुख्य संयोजक पंडितराव घरजाळे आश्रोबा दत्तराव सोडगीर बालासाहेब प्रभाकर सोडगीर पंडित निवृत्ती सोडगीर दादासाहेब खांडेकर आप्पासाहेब रुपनर गोविंद नीळकंठ मुंडे केशव भेंडेकर दशरथ मोटे शिताराम देवकते बाबुराव नागरगोजे भास्कर सांगळे विवेक मुंडे जगन्नाथ मुंडे बालासाहेब रंगनाथ सोडगीर बालासाहेब गुट्टे पदमाकर मरगीळ योगेश फड नागनाथ गरड विजयकुमार गरड बापुराव भालेराव बळीराम सोडगीर भगीरथ फड धनराज मुंडे माधवराव मुंडे वैजनाथ मुंडे नितीन खोडवे बळीराम मुंडे हनुमंत परकड त्रिंबकराव घरजाळे विठ्ठल खांडेकर सतिश गवळी विठ्ठल श्रीराम घरजाळे शिवप्रसाद मुंडे दत्ता आयनीले बालाजी किसनराव मुंडे बालासाहेब वाळके आदी असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते

Previous article“लखीमपूर खिरी येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ गृहमंत्र्यांना बडतर्फ करून आरोपींना तात्काळ अटक करा”..!
Next article“अशोक विजयादशमी” म्हणजेच धम्मचक्र प्रवर्तन दिनी सर्व शासकीय कार्यालयावर धम्म ध्वज फडकविण्यात यावा:- डॉ. राजन माकणीकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here