Home महाराष्ट्र “लखीमपूर खिरी येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ गृहमंत्र्यांना बडतर्फ करून आरोपींना तात्काळ अटक...

“लखीमपूर खिरी येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ गृहमंत्र्यांना बडतर्फ करून आरोपींना तात्काळ अटक करा”..!

30

🔹”उमरखेड महाविकास आघाडीची निवेदनाद्वारे मागणी”

✒️सिध्दार्थ दिवेकर(तालुका प्रतिनिधी,उमरखेड)मो:-9823995466

उमरखेड(दि.5ऑक्टोबर):-दि. 3/10/2021 रोजी उत्तर प्रदेश मधील लखीमपुर खीरी येथे चालू असलेल्या शेतकऱ्यांच्या शांततापूर्वक आंदोलनावर भाजपच्या केंद्रीय गृहमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने सत्तेचा रुबाब दाखवत शेतकऱ्यावर आपल्या गाड्यांचा तापा चढवून शेतकऱ्यांना चिरडून त्यांची हत्या केली.

ही घटना अत्यंत अमानवीय असंवैधानिक व निंदनीय आहे. यांचा आम्ही सर्व महाविकास आघाडीतर्फे कठोर निषेध करीत आहोत.

सदर घटना घडल्याने मानवीय दृष्टिकोन ठेवून काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी, शेतकरी कुटुंबियांना भेटण्यासाठी लखीमपुर-खीरी ला जात असतांना कोणताही प्रशासकीय आदेश नसतांना असंवैधानिक सत्तेचा दुरुपयोग करत त्यांना अटक केली.

हा प्रकार लोकशाहीला काळिमा फासणारा आहे. त्यानिमित्ताने काँग्रेस,राष्ट्रवादी, शिवसेना, प्रहार, असे महा विकासआघाडी च्या वतीने निंदा करून जाहीर निषेध केला.तात्काळ कारवाई करून लखीमपुर खीरी येथील प्रकारातील दोषीवर व केंद्रीय गृहराज्यमंत्री यांना बडतर्फ करण्यात यावी.

शेतकऱ्यावरील हिंसाचार व शेतकऱ्याचा नरसंहार करणाऱ्या मोदी,योगी, सरकारच्या विरोधात व काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतल्याच्या विरोधात निषेध व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अन्यथा महाविकासआघाडी चे सर्व पक्ष मिळून उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदन मार्फत दिला.

यावेळी प्रकाश पाटील, माजी आमदार विजय खडसे, सतीश नाईक,ॲड बळीराम मुटकुळे, राजू जयस्वाल, राहुल0 मोहितवार, गजानन कदम, देवानंद भारती, प्रेम हनवते, संदीप ठाकरे, श्याम चेके, अतुल मैड, मोईन खान, शेख अदीम,ईश्वर गोस्वावी, गणेश रावते, नंदू अग्रवाल, गजानन भारती, बाळासाहेब चंद्रे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here