Home महाराष्ट्र राष्ट्रवादीच्या प्रदेश संघटक पदी सागर गायकवाड यांची निवड

राष्ट्रवादीच्या प्रदेश संघटक पदी सागर गायकवाड यांची निवड

77

✒️पिंपरी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पिंपरी(दि.5ऑक्टोबर):- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा.ना.श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे,सरकारी योजना तळागाळातील सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील साहेब,ना.अजित दादा पवार साहेब,खासदार सुप्रियाताई सुळे, शिवाजीराव गर्जे साहेब यांच्या मान्यतेने पिंपरी चिंचवड शहरातील सागर गायकवाड यांची राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेलच्या “प्रदेशसंघटक” पदी निवड झाल्याचे पत्र आज राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेलचे प्रदेशाध्यक्ष श्री शिवाजीराव खटकाळे, यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी उपाध्यक्ष योगेश जाधव,प्रविण बल्लाळ,किरण देशमुख,संतोष शिंदे उपस्थित होते.

सागर गायकवाड हे बँन्ड मालक-चालक संघटनेचे राज्याचे अध्यक्ष असुन खेडोपाडी मोठ्या प्रमाणावर राज्यभर जाळे निर्माण केलेलेअसुन “गाव तेथे शाखा” उघडलेल्या आहेत सर्व समाजातील लोकांची त्यांनी मोट बांधलेली असुन सामान्य माणसांना,कामगारांना,कलावंतांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच्या स्थापनेपासुन महाराष्ट्र बँन्ड कलाकार संघटना पक्षासोबत कामकाज करत आहे.पक्षाने माझ्यावर दाखविलेला विश्वास याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी यांचा आभारी राहिल अशी भावना सागर गायकवाड यांनी व्यक्त केली*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here