Home महाराष्ट्र लोकसभेचे माजी सदस्य रामशेठ ठाकूर यांनी दिली कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ...

लोकसभेचे माजी सदस्य रामशेठ ठाकूर यांनी दिली कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च व सातारा येथे सदिच्छा भेट

44

✒️कुशल रोहिरा(सातारा प्रतिनिधी)

सातारा(दि.5ऑक्टोबर):- रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल चे जेष्ठ सदस्य व थोर देणगीदार व लोकसभेचे माजी सदस्य श्री रामशेठ ठाकूर यांनी आज रयतेच्या १०२ व्या वर्धापन दिनानिमित्त कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च वर्ये सातारा येथे सदिच्छा भेट दिली. त्यांच्या शुभ हस्ते अंतीम वर्षातील मुलांना कॅम्पस इंटरव्ह्यू द्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या बॅनरचे प्रकाशन झाले. करोना काळात इन्स्टिट्यूट ने केलेल्या कामाचे त्यांनी कौतुक केले.

तसेच गतवर्षी संशोधन व पेटंट नोंदणी केल्याबद्दल डॉ सारंग भोला यांना संस्थेने दिलेले प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले तसेच काॅपीराईट बद्दल डॉ राजेंद्र कुंभार व संशोधन पेपर प्रकाशित केलेबद्दल डॉ शिवराज निकम यांचा सत्कार केला.
तसेच संशोधन, काॅपीराईट व पेटंट नोंदणी साठी सहकारी प्राध्यापकांना प्रेरणा व प्रोत्साहन केल्याबद्दल संस्थेने प्रशस्तीपत्र देऊन इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ बापूसाहेब सावंत यांचा माननीय श्री रामशेठ ठाकूर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
इन्स्टिट्यूटच्या सर्व शिक्षकांशी चर्चा करून मार्गदर्शन केले व समाधान व्यक्त केले. व इन्स्टिट्यूटच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here