Home बीड युसुफ वडगाव पोलिस स्टेशन हद्दीत वृद्धाला जातीवाचक शिविगाळ रबरी पाईपने मारहाण …अॅट्राॅसिटिचा...

युसुफ वडगाव पोलिस स्टेशन हद्दीत वृद्धाला जातीवाचक शिविगाळ रबरी पाईपने मारहाण …अॅट्राॅसिटिचा गुन्हा दाखल

58

✒️नवनाथ पौळ(अंबाजोगाई,विभागिय प्रतिनिधी)मो:-8080942185

बीड(दि.5ऑक्टोबर):-जिल्ह्यातील केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात ७५ वर्षाच्या एका वयोवृद्ध इसमास रबरी पाईपणे मारहाण केली; म्हणून मारहाण करणाऱ्या नराधमा विरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबतची माहिती अशी की, आवसगाव ता. केज येथील रोहीदास सदाशिव आदमाने वय ७५ वर्ष दि. २ ऑक्टोबर शनिवार रोजी आवसगाव येथे दुपारी ४:०० वा. च्या सुमारास ते घरी असताना त्यांची ४ वर्ष वयाची नात वैष्णवी ही पेढ्यासाठी रडु लागल्याने ते गावातील हबु शेख याचे दुकानाला गेले; परंतु दुकान बंद होते.

म्हणुन ते गावातील गणपती मंदीरावर जाऊन उत्तम साखरे यास बोलत बसले. त्या वेळी गावातील सिध्देश्वर महादेव साखरे हा त्यांच्या जवळ आला व मला म्हणाला की, तु येथे मंदीरात बसुन त्याच्या आईची निंदा का करतोस ? असे म्हणून जातीवाचक शिविगाळ करीत रबरी पाईपने पाठीवर मारून मुक्कामार दिला. तसेच जातीवाचक शिवीगाळ करीत घराकडे ओढीत नेले. घरी गेल्या नंतर रोहिदास आदमाने यांची पत्नी भामाबाई हिने जाब विचारला असता तो निघून गेला.

त्या नंतर रात्री रोहिदास आदमाने यांनी हा प्रकार त्यांच्या मुलांना सांगितला त्या नंतर दि. ३ ऑक्टोबर रविवार रोजी रोहिदास आदमाने यांनी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी नुसार सिद्धेश्वर महादेव साखरे याच्या विरुद्ध गु.र.नं. १४६/२०२१ भा.दं.वि. ३२४, ५०४, आणि ॲट्रॉसिटीचे कलम ३(१) (आर), ३ (१) (एस) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास जिल्हा सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत हे करीत आहेत.

Previous articleशैक्षणिक व सामाजिक कार्य करणाऱ्या गटशिक्षणाधिकारी श्री. अशोकजी बिऱ्हाडे यांचे पी.आर.सी. ने केले अभिनंदन
Next articleग्रामसेवक युनियनचे चिमूर तालुकाध्यक्ष पदावर मोतीराम मडावी तर सचिव म्हणून दादाराव बांगडे यांची निवड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here