Home महाराष्ट्र बहुसदस्यीय प्रभाग म्हणजे सत्तेसाठी राज्यकर्त्यांकडून मतदारांची फसवणूक

बहुसदस्यीय प्रभाग म्हणजे सत्तेसाठी राज्यकर्त्यांकडून मतदारांची फसवणूक

67

🔸जनहित युवा मोर्चाचा आरोप; जनहित याचिका दाखल करण्याचा दिला ईशारा

✒️ सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.5ऑक्टोबर):-स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणूकीत बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीद्वारे निवडणूक घेण्याचा शिवसेनाप्रणित राज्य सरकारचा निर्णय विरोधी पक्षासोबत छूपी युती असुन बहुसदस्यीय प्रभाग म्हणजे सत्तेसाठी राज्यकर्त्यांकडून मतदारांची फसवणूक असल्याचा घणाघाती आरोप जनहित युवा मोर्चाचे अध्यक्ष शिवशंकर ताकतोडे यांनी केला आहे.बहुसदस्यीय प्रभाग पद्धती भारतिय लोकशाहीला घातक असुन जनहिताला मारक असल्याचे त्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.नगरसेवक हा सामान्य नागरिकांचा हक्काचा लोकप्रतिनिधी असतो.

सामान्य नागरिक व मतदार नगरसेवकांकडे आपल्या प्रत्येक नागरी समस्या हक्काने सांगत असतो परंतू बहुसदस्यीय प्रभागात बहुतांश वेगवेगळ्या राजकिय पक्षांचे धनदांडगे उमेदवार निवडून येतात आणि एकही नगरसेवक प्रामाणिकपणे, तळमळीने काम करत नाहीत एकदुसर्याकडे बोट दाखविण्याचे व विकासकामांवरून एकदुसर्यावर आरोप-प्रत्यारोप करून प्रभागात राजकिय वातावरण तापविण्याचेच काम पाच वर्षे प्रभागात होत असते. यामुळे प्रभागात नागरी समस्या वाढत जातात आणि प्रभागातील नागरिकांची घुसमट होत असल्याचाच अनुभव आतापर्यंत प्रभाग पद्धतीत नागरीकांना आलेला आहे.

तसेच बुथवर एकापेक्षा अधिक ईव्हीएम मशीन लागलेल्या असतात ईथे मतदारांना एकापेक्षा अधिक उमेदवारांना मतदान करायचे असते त्यामुळे अशिक्षित-अल्पशिक्षित मतदारांची मतदान करतांनी तारांबळ उडते व ते गोंधळलेल्या स्थितीत मनपसंद उमेदवाराला मतदान करू शकत नाहीत आणि कोणत्याही उमेदवारासमोरील बटने दाबून मोकळे होतात यामुळे चूकीचे उमेदवार निवडून येतात. त्यामुळे ही पद्धत लोकशाहीला घातकच आहे.बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीद्वारे निवडणूक घेऊन प्रस्थापित राजकिय पक्ष पक्षांतर्गत बंडखोरीला लगाम लावण्याचा व स्थानिक, प्रादेशिक पक्ष, संघटना, गट, आघाड्या, इच्छूक सामाजिक कार्यकर्ते आणि अपक्ष उमेदवारांचे कंबरडे मोडण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत आहे. जनतेच्या समस्या व भावनांचा अनादर करून स्व:ताच्या राजकिय स्वार्थ आणि लालसेपोटी शिवसेनेने हा निर्णय घेतला असल्याची टिका देखील ताकतोडे यांनी केली आहे.

भारतिय संविधानाने ‘ एक व्यक्ती एक मत ‘ असा अधिकार बहाल केला असुन जवळपास हीच पद्धत योग्य आहे परंतू कायद्याची पायमल्ली करीत मागील काही वर्षांपासुन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत आपल्याच पक्षाला बहुमत मिळावे म्हणून ही बहुसदस्यीय प्रभाग पद्धती मतदारांवर बळजबरीने लादण्याची कुटनिती राजकिय पक्ष करीत आहेत. मग लोकसभा व विधानसभा निवडणूकांमध्ये देखील एका व्यक्तीला एकापेक्षा अधिक मत देण्याचा कायदा करणार काय? राज्याची राजधानी मुंबईत वार्डपद्धतीने व ईतर ठिकाणी बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक घेणे मनमानी नव्हे काय? असे सवाल करित राज्य शासनाने आपल्या जनविरोधी व राष्ट्रविरोधी निर्णयाचा पुर्नविचार करून एकसदस्यीय वार्डपद्धतीनेच आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेण्याचा आदेश त्वरित जारी करावा अन्यथा जनहित युवा मोर्चाद्वारे राज्यशासनाच्या या तुघलकी निर्णयाविरूद्ध उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा ईशारा महासचिव ऍड. सचिन मेकाले यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here