Home महाराष्ट्र भं.तळोधी येथे शाळाप्रवेशोत्सव व उत्कृष्ठ शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न

भं.तळोधी येथे शाळाप्रवेशोत्सव व उत्कृष्ठ शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न

107

🔹मान. सुधाकर मडावी उत्कृष्ठ शिक्षक पुरस्कार २०२१ ने सन्मानित

✒️नितीन रामटेके(गोंडपीपरी प्रतिनिधी)

गोंडपीपरी(दि.5ऑक्टोबर):- जिल्हा परिषद उच्च प्राथ. शाळा,भं.तळोधी येथे शाळाप्रवेशोत्सव व उत्कृष्ठ शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला.

याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.लक्ष्मीताई बालुगवार सरपंच भं.तळोधी तर उद्घाटक म्हणून मान. वैष्णवीताई अमर बोडलावार,सदस्य, जि.प.चंद्रपूर तर प्रमुख अतिथी म्हणून मान. सुरेंद्र धाबर्डे,उपसरपंच, मान.संजय गोविंदवार,अध्यक्ष, शा.व्य.स.,मान. संजय रामगोन वार,माजी अध्यक्ष,शा.व्य.स.,मान. भानेश कंकलवार,सचिव,शूरवीर मल्हारराव होळकर बहुउद्धेशिय संस्था,भं.तळोधी,मान. लक्ष्मण येग्गेवार,अध्यक्ष,तं.मु.स.,रामदास येग्गेवार,सदस्य,मान. श्रीनिवास येग्गेवार, सदस्य,शूरवीर मल्हारराव होळकर बहुउद्धेशिय संस्था,भं.तळोधी,मान.मालनताई धाबर्डे,अंगणवाडी सेविका,मान.नामदेव राऊत,शि.वि.अ.मान. सुनिल मुत्यालवार,के.प्र. मान.रेखाताई कारेकर,मु.अ.मंचावर उपस्थित होते.

दरवर्षी शूरवीर मल्हारराव होळकर बहुउद्धेशिय संस्था,भं.तळोधीच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाला उत्कृष्ठ शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.यावर्षी हा पुरस्कार शाळेतील जेष्ठ शिक्षक मान. सुधाकर मडावी सर यांना जाहीर झाला.आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक मान.वैष्णवीताई बोडला वार,सदस्य, जि.प.चंद्रपूर यांचे हस्ते श्री.सुधाकर मडावी सर,विषय शिक्षक यांना शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह,सन्मानपत्र देऊन उत्कृष्ठ शिक्षक पुरस्कार २०२१ ने गौरविण्यात आले.

आज प्रदीर्घ काळानंतर शाळा सुरू झाल्याने शाळाप्रवेशोत्सवांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुस्तके व पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.*या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मान. दुशांत निमकर सर यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार मान. तानाजी अल्लीवार सर यांनी मानले.यावेळी शाळेतील सर्व शिक्षकांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here