Home महाराष्ट्र सुप्रसिद्ध विधीज्ञ नितीन माने रिपाई डेमोक्रॅटिक लीगल सेल प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त

सुप्रसिद्ध विधीज्ञ नितीन माने रिपाई डेमोक्रॅटिक लीगल सेल प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त

37

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.5ऑक्टोबर):-उच्च न्यायालायचे सुप्रसिद्ध विधिज्ञ नितीन माने यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाच्या कायदेविषयक विभागाच्या प्रमुख पदी नियुक्त करण्यात आले आहे.सदर निवड पूज्य भदन्त शिलबोधी व पक्ष महासचिव डॉ राजन माकणीकर यांच्या शिफारशींने झाली असून पक्षप्रमुख कनिष्क कांबळे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

सुप्रसिद्ध विधिज्ञ नितीन माने आंबेडकरी चळवळीतील अग्रगण्य व स्वाभिमानी तरुण तडफदार नेतृत्व असून पक्षाच्या वतीने 12 कलमी कार्यक्रम राबवून पीडित समाज बांधवांना न्याय मिळवून देतील अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय उपाध्यक्ष व महाराष्ट्र राज्य प्रभारी हरिभाऊ कांबळे व्यक्त केली.

पूज्य भदन्त शीलबोधी, पक्षप्रमुख कनिष्क कांबळे, राष्ट्रीय महासचिव डॉ माकणीकर यांनी माझ्यावर विश्वास ठेवून पक्षाची कायदेविषयक बाजू माझ्या खांद्यावर टाकली असून माझ्या पदाचा वापर मी रिपाई डेमोक्रॅटिक पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यास करेल असा मनोदय नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष ऍड नितीन माने यांनी व्यक्त केला.

राज्य महासचिव कॅप्टन श्रावण गायकवाड, राष्ट्रीय युवा सचीव भाई विजय चव्हाण, बंजारा सेल प्रदेशाध्यक्ष शिवा राठोड, गुजराथी सेल मुंबई प्रदेशाध्यक्ष निरंजन दलाल, नारायण घोष, संजय कांबळे, यांनी अभिनंदन करून ऍड नितीन माने यांना सदिच्छा व्यक्त केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here