Home महाराष्ट्र गणेश पूजनाने महाराजा अग्रसेन जयंती पर्व उत्साहात प्रारंभ : रक्तदान व अस्थिरोग...

गणेश पूजनाने महाराजा अग्रसेन जयंती पर्व उत्साहात प्रारंभ : रक्तदान व अस्थिरोग शिबिरास प्रचंड प्रतिसाद

69

✒️मनोज नगरनाईक(खामगाव प्रतिनिधी)

खामगांव(दि.4ऑक्टोबर):-अग्रवाल समाजाचे आराध्य महाराजा अग्रसेन यांची जयंती गुरुवार दि ७ ऑक्टोंबर रोजी साजरी करण्यात येत असुन, या निमित्त रविवार दि ३ ऑक्टोंबरला अग्रसेन भवन अकोला येथे विविध उपक्रमांसह जयंती उत्सवाला प्रारंभ करण्यात आला. सकाळी गणेश पूजनाचा कार्यक्रम मोठ्या भक्तीभावात संपन्न झाला. अग्रवाल समितीचे अध्यक्ष शैलेंद्र (बंटी ) कागलीवाल यांच्या अध्यक्षतेत आयोजित गणेश पूजन सोहळ्यात पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अस्थिरोग विशेषज्ञ डॉ. नितिश अग्रवाल आणि डॉ. श्रद्धा अग्रवाल (खामगांव) उपस्थित होते. मान्यवरांनी श्री गणेश पूजन केले.

पाहुण्यांचे स्वागत अग्रसेन भवन ट्रस्टचे अध्यक्ष गिरीशबाबू अग्रवाल यांनी शाल श्रीफळ प्रदान करून केले तर वेदप्रकाश बंसल, शिवप्रकाश रुहाटीया यांनी स्मृतीचिन्ह प्रदान केले आणि पंडित कल्पेश शर्मा यांनी वैदिक मंत्र म्हटले. दरम्यान भवन परीसरात डॉ.सतीश गुप्ता, डॉ एस एम अग्रवाल यांच्या उपस्थितीत भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले. रक्त संकलन साई जीवन ब्लड बँकेने केले. यासोबतच दुस-या सभागृहात आयोजित अस्थिरोग तपासणी शिबिरात अस्थिरोग विशेषज्ञ डॉ. नितीश अग्रवाल यांनी रुग्णांची तपासणी केली. या शिबिराला महिला व पुरुष बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत 100 च्या वर लोकांनी शिबिराचा लाभ घेतला.भवन परिसरात दि ७ ऑक्टोबरला जयंती दिनी समाजातील ८७ वर्षा वरील सेवाभावीकांसाठी विविध साहित्याने तुलादान कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे संचालन अग्रवाल समितीचे सचिव निकेश गुप्ता यांनी तर आभार डॉ. जुगलकिशोर चिरानिया यांनी मानलेत.

यावेळी नवलबाबू भरतिया, पवन गर्ग, अशोक अग्रवाल, बजरंग अग्रवाल, निरंजन अग्रवाल, ॲड. सुरेश अग्रवाल गुरुजी, जेष्ठ पत्रकार किरण अग्रवाल, जेष्ठ पत्रकार जगदीश अग्रवाल (खामगांव), बबलू सोनालावाला, महिला मंडळ अध्यक्ष ममता अग्रवाल, नवयुवक मंडळाचे अध्यक्ष लव अग्रवाल, वसंत बाछूका, शिवम अग्रवाल, कृष्णा तातिया, रोहित रुंगठा, मनोज अग्रवाल, राजेश अग्रवाल, दिलीप चौधरी, ॲड मनोज अग्रवाल, रोहित केडिया,आशा गोयनका, जगदीश बाछूका, अनिल अग्रवाल, महावीर गाडोदिया, ललित गुप्ता, संतोष अग्रवाल, संध्या अग्रवाल, महेंद्र खेतान, विनोद टोरका, निलेश बोर्डीवाल, पंकज अग्रवाल, संजय टिकूपोते, सुनील अग्रवाल खंडवा, आशिष अग्रवाल, विजय छावछरिया, ऋतिक अग्रवाल, योगेश गोयल, शुभम अग्रवाल, प्रतुल भारूका, गोपाल टेकडीवाल, संदेश केडिया, कृष्णा पाडिया, सौ. संतोष केडिया, आशा गोयनका, रूची गुप्ता, मीना कागलीवाल, महावीर गुप्ता, अरविंद अग्रवाल, विजय केडिया, गोपाल देहलीवाला, भवन व्यवस्थापक गणेश अग्रवाल समवेत अग्रवाल समिती,अग्रसेन भवन ट्रस्ट, महिला मंडल, नवयुवक मंडळाचे पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here