




🔹गट शिक्षणाधिकारी यांची शाळेला सदिच्छा भेट
✒️धरणगाव प्रतिनिधी(पी. डी.पाटील सर)
धरणगांव(दि.4ऑक्टोबर):- सुवर्णमहोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन जल्लोषात स्वागत करण्यात आले.
तब्बल दीड वर्षानंतर शाळेची घंटा वाजली. यानिमित्ताने शाळेला तोरण बांधुन सजावट करण्यात आली. शालेय परिसरात गेटसमोर रांगोळी काढण्यात आली.
शाळेत आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पी.आर. सोनवणे मॅडम, पर्यवेक्षक जे.एस.पवार व संपुर्ण स्टॉफ यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
सर्वप्रथम शाळेचे सेवक अशोक पाटील यांनी विद्यार्थ्यांचे हात सॅनटाईझ केले. यानंतर क्रिडाशिक्षक हेमंत माळी सर यांनी विद्यार्थ्यांचे तापमान चेक केले.
शाळेच्या मुख्याध्यापक सौ. पी.आर.सोनवणे, ज्येष्ठ शिक्षिका एम.के.कापडणे, पर्यवेक्षक जे.एस.पवार व ग्रंथपाल गोपाल महाजन यांच्या हस्ते शाळेतील मुलां – मुलींना पाठ्यपुस्तके देण्यात आली.
शाळेतील पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी आनंदोत्सव होता. नटलेली सजलेली शाळा पाहून मुलांना खूप आनंद वाटला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांची हितगूज केले. याप्रसंगी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मा. अशोक बिऱ्हाडे साहेब यांनी शाळेला सदिच्छा भेट दिली. विद्यार्थ्यांशी व शिक्षकांशी संवाद साधला.




