Home महाराष्ट्र पालकांच्या तक्रारीने तरुणीच्या मृत्यूचे गूढ वाढले

पालकांच्या तक्रारीने तरुणीच्या मृत्यूचे गूढ वाढले

90

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.4ऑक्टोबर):-गुरुवारी शहरातील तालुक्यातील मासोळी धरण शेजारी स्कार्पिओ ( क्रमांक एमएच- २२ एएम ८१००) अपघातात एका १९ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाला होता. परंतु गंगाखेड पोलीस ठाण्यात या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्याने संतापलेले कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे माजी आमदार संतोष टारफे, मयत मुलीचे आईवडील, कळमनुरी तालुक्यातील गावासह १० ते १५ गावचे सुमारे ३०० ते ४०० नागरिक रविवारी गंगाखेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी श्रेनिक लोढा यांच्या कार्यालयावर धडकत मयत तरुणीच्या मृत्यूस केवळ अपघात हे कारण नसून घातपाताचा प्रकार असल्याचा लेखी जबाब मयत मुलीच्या आईवडिलांनी डीवायएसपी समक्ष दिल्याने या प्रकरणाला नाट्यमय वळण भेटले आहे.

तसेच उद्या सोमवारी याच प्रकरणाची चौकशी व्हावी या मागणीसाठी परभणीचे शिवसेनेचे खासदार संजय जाधव व शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम हे गंगाखेडला येणार असल्याने या एकूण प्रकरणाच्या पोलीस चौकशीबद्दल मयत मुलीचे आई-वडील कळमनुरीचे आमदार व तालुकावासियांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहेत.

         याबाबतची अधिक माहिती अशी की, गुरुवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील मासोळी धरणा शेजारील परिसरात एका स्कार्पिओचा अपघात झाला. या अपघातात एक तरुण व दोन तरुणी होत्या. त्यापैकी एका तरुणीचा या घटनेत मृत्यू झाला. याप्रकरणी अन्य तरुणीच्या फिर्यादीवरून कामगार हाताच्या केस दाखल होऊन स्कार्पिओ चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला होता परंतु या एकूण संशयास्पद घटनेमुळे मयत मुलीचे कुटुंबीय व गंगाखेड शहरवासियांत अस्वस्थता वाढली होती व हा घातपाताचा प्रकार आहे अशी तालुकाभरात चर्चा सुरू झाली होती. या घटनेच्या अनुषंगाने कळमनुरीचे काँग्रेसचे माजी आमदार संतोष टारफे हे हिंगोली जिल्ह्यातील ३०० ते ४०० नागरिकांसह रविवारी गंगाखेड डीवायएसपी लोढा यांना भेटावयास आले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य डॉ. सतीश पाचपुते व पंचायत समिती सदस्य दिलिप डुकरे, निमटोक ग्रामपंचायतीचे सरपंच गजानन हाके, गंगाखेड शिवसेनेचे विधानसभा प्रमुख राम लटके, उपजिल्हाप्रमुख मनोज काकाणी, तालुकाप्रमुख अनिल सातपुते, शहरप्रमुख जितेश गोरे, नंदकुमार काकाणी, मनोहर व्हावळे, संजय लाला अनावडे, आर डी भोसले, शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटिका सखूबाई लटपटे यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून डीवायएसपी श्रेनिक लोढा यांनी मयत मुलीचा जबाब बंद खोलीत घेतला असून यासंदर्भात आयपीएस असलेले डीवायएसपी श्रेनिक लोढा आता पुढील भूमिका काय घेतात याकडे परभणी व हिंगोली जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. यावेळी आमदार संतोष टारफे व जनसमुदाय यांनी गंगाखेड पोलिसांच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्हे उपस्थित केले असून मयत मुलीस व कुटुंबियांना न्याय द्यावा अशी एकमुखी मागणी रविवारी आमदारांसह ३०० ते ४०० जनसमुदायाने केली आहे.

दरम्यान परभणीचे खासदार संजय जाधव व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम हे उद्या सोमवारी गंगाखेड शहरात मयत मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेणार असून भेटीअंती पुढील भूमिका घेणार असल्याची शिवसेनेकडून माहिती प्राप्त झाली आहे.पोलीस कारवाईबाबत पालक असमाधानी, पालकांच्या नूतन जबाबावरून गुन्हा दाखल करावा संतोष टारफे, माजी आमदार कळमनुर  संबंधित मयत मुलीच्या मृत्यूचे कारण अपघात हें असून घातपाताची शक्यता पालकांनी उपस्थित केली आहे म्हणून मी मुद्दाम गंगाखेडला पोलिस अधिकाऱ्यांच्या भेटीस आलो असून पालकांच्या नूतन जबाबावरून अस गंगाखेड पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांनी गुन्हा नोंदवावा अपघाताचा बनाव पासून घातपाताची दाट शक्यता आहे.

न्यायाधीशासमोर आई-वडील मयत मुलीच्या आई-वडिलांचा इंन कॅमेरा जबाब होण्याची शक्यत रविवारी दिवसभर आमदार संतोष टारफे यांच्यासह मयत मुलीचे आई-वडील, कळमनुरी तालुक्यातील नागरिक यांनी संबंधित अपघातावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून सखोल चौकशीअंती केवळ अपघाताचा गुन्हा दाखल न करता अन्य दाखल गुन्हा दाखल करावा अशी मागणी लावून धरल्याने डिवायएसपी लोढा यांनी रविवारी दुपारी बंद खोलीत मयत मुलीच्या आई-वडिलांचा जबाब घेतला आहे. यासंदर्भात डीवायएसपी लोढा न्यायालयाशी लेखी पत्रव्यवहार करून पुन्हा एकवार मयत मुलीच्या आई-वडिलांचा न्यायाधीशासमोर ‘इन कॅमेरा’ जबाब नोंदविणार असल्याचे खात्रीलायक वृत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here