Home महाराष्ट्र कोरोना संसर्गाचे नियम पाळत सरसकट शाळा उघडा व विनाअनुदानित शाळांना विनाअट सरसकट...

कोरोना संसर्गाचे नियम पाळत सरसकट शाळा उघडा व विनाअनुदानित शाळांना विनाअट सरसकट अनुदान द्या : अध्यापकभारती

297

✒️संदिप सोनवणे(विशेष प्रतिनिधी)मो:-९६०४१६२७४०

येवला(दि.4ऑक्टोबर)- मानवी जीवनात शिक्षण-शाळांचे महत्व कधी नव्हे इतके जगाला कळाले आहे. महाराष्ट्र तथा देशातील शाळा महाविद्यालय मार्च २०२० पासून आजवर शाळा बंद राहिल्या आहेत. ऑनलाईन शाळा अभ्यासाचा पुरता बोजवारा उडाला होता, अशा वेळी दिनांक ४ सप्टेंबर २०२१ पासून शहरातील इयत्ता आठवी ते बारावी व ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी इयत्तेचे वर्ग प्रत्यक्ष (ऑफलाईन) स्वरूपात उघडण्याची आनंदवार्ता असली तरी आता शहरी व ग्रामीण भागातील अंगणवाडी (प्ले ग्रुप वगळता) प्राथमिक शाळा पासून सर्व शाळा महाविद्यालय सरसकट उघडव्यात व आयुष्याची वीस वर्षेहून अधिक काळ विनावेतन काम करणाऱ्या विनाअनुदानित शाळा-वर्ग तुकड्यावर कार्यरत शिक्षकांना विनाअट सरसकट १००% अनुदान द्यावे असे आवाहन राष्ट्रीय बालक-विद्यार्थी, पालक,शिक्षक,शिक्षण-प्रशिक्षण संस्था अध्यापकभारतीच्या वतीने सरकारला निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.

निवेदनात शाळा-महाविद्यालय परिसर व बस प्रवासातील विद्यार्थी हिता करता कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सरकारी आरोग्य विभाग व केंद्र राज्य सरकारने दिलेल्या नियमावलीचे काटेकोर पालन करण्यात यावे.,
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनचे (वय वर्ष १८ च्या पुढील) कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात यावे, शाळा महाविद्यालयात अध्यापन करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण करण्यात यावे, शाळा- महाविद्यालय परिसरातील स्वच्छता गृह व पाण्याची सुविधा जंतू विरहित करण्यात यावी व संबंधित प्रशासनाने या बाबीकडे विशेष लक्ष द्यावे, क्रमिक अभ्यासक्रमाची पुस्तके त्वरित वाटप करण्यात यावीत, आठवड्यातून एक दिवस दप्तर विना शाळा उपक्रम राबवावा.

पर्यावरण व आरोग्य जनजागृती करता शाळा महाविद्यालयीन विध्यार्थ्यांना क्षेत्र कार्य (फिल्ड वर्क ) देण्यात यावे, क्रीडा, कला, कार्यानुभव, संगणक तासिका सक्तीने घेतल्या जाव्यात व त्या विषय शिक्षकांची नियुक्ती तातडीने करण्यात यावी,राज्यातील सर्व विनाअनुदानित शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना विनाअट सरसकट १००% अनुदान देण्यात यावे, शिक्षण क्षेत्रातील विनाअनुदानित व स्वयंअर्थसाहित धोरण तात्काळ रद्द करण्यात येऊन इयत्ता बालवाडी (अंगणवाडी) ते १२ वी पर्यंतचे शिक्षण सर्वांना मोफत व सक्तीचे करण्यात यावे.

आदी मागण्या सरकार कडे अध्यापकभारती ने निवेदनाद्वारे केल्या असल्याची माहिती संस्थापक शरद शेजवळ यांनी दिली आहे.निवेदनावर सुभाष वाघेरे,शैलेंद्र वाघ,महेंद्र गायकवाड,अमीन शेख,मिलिंद गुंजाळ,संतोष बुरंगे, प्रा.मिलिंद गांगुर्डे,वनिता सरोदे-पगारे,भारती बागुल,अतुल डांगळे,दीपक शिंदे,कुलदिप दिवेकर,सागर पगारे, प्रा. के. एस. केवट, प्रा.नितीन केवट आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here