Home महाराष्ट्र महिलांच्या लैंगिक छळाच्या तक्रार चौकशी ,जिल्हासमितीवर डाॅ. समता तुमवाड/बिरादार यांची निवड….

महिलांच्या लैंगिक छळाच्या तक्रार चौकशी ,जिल्हासमितीवर डाॅ. समता तुमवाड/बिरादार यांची निवड….

28

✒️अशोक हाके(बिलोली,ता.प्र)मो:-9970631332

बिलोली(दि.3ऑक्टोबर):-कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध,मनाई व निवारण)अधिनियम 2013 मधील तरतुदीनुसार ,शासन निर्णयान्वये कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाच्या तक्ररीची चौकशी करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती सदस्य म्हणून ,मा.जिल्हाधिकारी डाॅ. विपीन इटनकर यांनी त्यांच्या वीस वर्षाचा, महिला व बाल विकास क्षेत्रातील शासकीय व सेवाभावी संस्थामधील कार्याचा अनुभव लक्षात घेऊन, ही निवड केलेली आहे…

सद्यस्थितीत त्या बाल न्याय मंडळ नांदेड येथे सदस्य म्हणून कार्यरत आहेत व कौटुंबिक सल्ला केंद्राच्या माध्यमातून महिलांच्या विविध प्रश्नांवर व पुनर्वसन कार्यात सक्रिय सहभागी आहेत.त्यांच्या या निवडीबद्दल सर्व सामाजिक स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे..त्या प्रसिद्ध शाहीर शा.दिगु तुमवाड यांची पुतणी आसून सामाजिक कार्यकर्ते श्री.दत्ता तुमवाड यांच्या कन्या आहेत..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here