Home विदर्भ राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती साजरी

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती साजरी

65

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी(दि.3ऑक्टोबर):-ब्रह्मपुरी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रणमोचन महात्मा गांधी तंटामुक्त समिती तसेच ग्रामपंचायत च्या वतीने दिनांक 2 ऑक्टोंबर रोजी येथील हनुमान मंदिराच्या सभागृहात महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली सर्वप्रथम महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष दादाजी पिलारे यांनी पुष्पमाला अर्पण करून महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला आदरांजली वाहिली.

यावेळी रणमोचन येथील पोलीस पाटील तथा निमंत्रक अस्मिता पिलारे यांनीसुद्धा पुष्पमाला अर्पण करून आदरांजली वाहिली यावेळी ग्रामपंचायतीच्या सरपंच नीलिमा राऊत उपसरपंच सदाशिवराव ठाकरे पत्रकार विनोद दोनाडकर ग्रामपंचायत सदस्य संजय प्रधान ग्रामपंचायत सदस्य घनश्याम मेश्राम मंदा सहारे तंटामुक्त समितीचे सदस्य रामदास प्रधान प्रतिष्ठित नागरिक ललित दहिकर रामलीला समितीचे दुबे साहेब ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती यावेळी अनेक मान्यवरांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.

Previous articleग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती बैठक संपन्न
Next articleतरूण-तरूणींना लष्करी शिक्षण!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here