Home नांदेड “धर्मनिरपेक्ष पणाचे खरे प्रतीक वृक्षच”- दादासाहेब शेळके

“धर्मनिरपेक्ष पणाचे खरे प्रतीक वृक्षच”- दादासाहेब शेळके

274

✒️सिध्दार्थ दिवेकर(विशेष प्रतिनिधी)मो:-9823995466

नांदेड(दि.3ऑक्टोबर):- आपले भारतीय संविधान धर्मनिरपेक्ष असून एकाद्याला न्याय,संरक्षण,अधिकार मतदान ईत्यादी ईत्यादी अधिकार देत असताना व्यक्तीची जात व धर्म बघत नाही. त्याचप्रमाणे वृक्ष सुध्दा माणसाला सावली, हवा, फळ, पाणी व जळतन ईत्यादी निस्वार्थी पणे देत असताना व्यक्तीची जात व धर्म बघत नाही.

म्हणुण खर्या अर्थाने धर्मनिरपेक्ष पणाचे प्रतीक वृक्ष असल्याचे प्रतिपादन भिम टायगर सेना राष्ट्रीयअध्यक्ष दादासाहेब शेळके यांनी जीव अंकुर बहु उद्देशीय सेवाभावी संस्था हदगाव व कुंभ दीपस्तंभ संस्था नांदेडच्या वतीने आयोजी त वृक्षारोपण कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक हनुमंतजी गायकवाड साहेब होते तर प्रमुख पाहुणे वनपाल कावळे मॅडम मं.मुफ्ती साहब,पठान सर राष्ट्रपालदादा सावतकर पत्रकार गौतमदादा वाठोरे,अनुप सारडा, गणेश जारंडे पाटील,शेख शहबाज, पत्रकार विनोद चिल्लोरे, मोरे सर,जमादार केंद्र साहेब आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना दादासाहेब शेळके म्हणाले की खऱ्या अर्थाने आपल्या देशाला समाजवादी, लोकशाही, गणराज्य व,धर्मनिरपेक्ष घडवि ण्या साठी व देशात सामाजिक,आर्थिक, राजकीय समता निर्माण करुन राष्ट्राची, एकता,एकात्मता व अखंडता जोपासण्या साठी प्रत्येक जाती धर्मातील कार्यकर्त्यांनी वृक्ष्या (झाड) प्रमाणेच काम करावे. असे ते शेवटी म्हणाले.

यावेळीं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कर्ते व आयोजक हरिष्चंद्र चिल्लोरे सर यांचा सामाजिक कार्याबद्दल पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड साहेब यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला.

यावेळी ब्राइट इंग्लिश स्कूल हदगाव च्या प्रांगणात जीवन अंकुर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व कुंभ दीपस्तंभ संस्था नांदेड च्या वतीने शेकडो झाडाचे मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here