Home महाराष्ट्र शिधापत्रिकेतील नावे तपासा- निलावाड

शिधापत्रिकेतील नावे तपासा- निलावाड

85

✒️अशोक हाके(बिलोली,ता.प्र.)मो:-९९७०६३१३३२

बिलोली(दि.3ऑक्टोबर):-तालुक्यात गेल्या २० वर्षापूर्वी शिधापत्रिका वाटप करण्यात आलेल्या आहेत.ब-याच जणाच्या शिधापत्रिकेतील नावे वगळलेली आहेत.आपल्या कुटूंबात नविन सदस्य संख्या वाढलेली आहेत.यासाठी शिधापत्रिकेचा नंबर अॉनलाईन आरसीप्रमाणे नावे तपासुन घ्यावित असे आवाहन पूरवठा विभागाचे तहसिलदार उत्तम निलावाड यांनी केले आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा २०१३ ला झाला असुन फेब्रुवारी २०१४ ला कायदा अस्तीत्वात आल्याने अॉनलाईन अन्न- धान्य वाटप करण्याच्या प्रक्रियेला नव्याने सुरूवात झाली.

तालुक्यातील ९१ गावची लोकसंख्या सन २०११ च्या जनगणनेनूसार १ लाख ७० हजार १५९ एवढी असुन तालुक्यात ९८ स्वस्त धान्य दुकानातुन शिधापत्रिकाधारकांना पूरवठा विभागाकडून वेगवेगळ्या योजनेमार्फत अन्न-धान्य वाटप केले जाते.यामध्ये अंत्योदय योजनेतील शिधापत्रिका ४ हजार ९६७,प्राधान्य कुटूंबकार्ड ११ हजार ९७७,लोकसंख्या ८७ हजार ९६९,लोकसंख्या ३३ हजार १८९,एनपीएच अंतर्गत कार्ड २४७ लोकसंख्या ८६८ आहे.

सन २०१४ पूर्वी स्वस्त धान्य दुकानदाराकडून १०० टक्के धान्य वाटप होत असल्याचे दाखवले जात असे आता मात्र पारदर्शक व्यवस्था असल्याने ९२ ते ९३ टक्के धान्य वाटप होत असल्याची माहीती पूरवठा विभागाचे पेशकार जाधव, लिपीक सुर्यवंशी यांनी दिली.आपल्या कुटूंबातील व्यक्तीची नावे शिधापत्रिकेतुन कमी करणे किंवा वाढवून घेण्याबाबत तपासणी करून घ्या कारण महात्मा फुले आरोग्य जीवनदायी योजना व धान्य मिळण्यापासुन कुणीही वंचित राहू नये याबाबत कुटूंब आरसी क्रमांक तपासुन घ्यावा असे आवाहन नायब तहसीलदार उत्तम निलावाड यांनी जनतेस केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here