Home महाराष्ट्र बहुजन क्रांती मोर्चा च्या वतीने आबासाहेब राजेंद्र वाघ यांचा ग्रंथ व पुष्पगुच्छ...

बहुजन क्रांती मोर्चा च्या वतीने आबासाहेब राजेंद्र वाघ यांचा ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान……

97

✒️ धरणगाव प्रतिनिधी(पी. डी. पाटील सर)

धरणगांव(दि.3ऑक्टोबर):- बहुजन क्रांती मोर्चा च्या वतीने भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष तसेच बहुजन क्रांती मोर्चा चे तालुका संयोजक आबासाहेब राजेंद्र वाघ यांचा अनमोल ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन व सन्मान करण्यात आला.

सविस्तर वृत्त असे की, तथागत – गौतम बुद्ध – संत कबीर – शिवराय – फुले – शाहू – आंबेडकर यांच्या विचारांचे पाईक तसेच बहुजन समाजासाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी नेहमी रस्त्यावर आंदोलन करणारे, पत्रकारिता क्षेत्राच्या माध्यमातून समाजाला न्याय मिळवून देणारे बहुजन क्रांती मोर्चाचे तालुका संयोजक भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आबासाहेब राजेंद्र वाघ यांची राष्ट्रीय पिछडा वर्ग [ओ.बी.सी] मोर्चा महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली म्हणून बहुजन क्रांती मोर्चा कडुन अनमोल ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

याप्रसंगी भारत मुक्ती मोर्चाचे राज्य महासचिव मोहन शिंदे, बामसेफचे जिल्हा महासचिव हेमंत माळी, छत्रपती क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील, बामसेफचे तालुकाध्यक्ष पी. डी. पाटील, उपाध्यक्ष किशोर पवार, महासचिव आकाश बिवाल, भारत मुक्ती मोर्चाचे तालुकाध्यक्ष गौतम गजरे, प्रोटॉन शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील देशमुख, बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क चे तालुकाध्यक्ष निलेश पवार, राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष गोरख देशमुख तसेच बहुजन क्रांती मोर्चाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here